• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, April 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात भाजपचा चौकार, ठाकरे गटाला धक्का; विजयानंतर ‘रिलस्टार’ वरून कलगीतुरा…

admin by admin
December 21, 2025
in राजकारण
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात भाजपचा चौकार, ठाकरे गटाला धक्का; विजयानंतर ‘रिलस्टार’ वरून कलगीतुरा…
0
SHARES
1.7k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. जिल्हयात भाजपने वर्चस्व सिद्ध करत धाराशिव, तुळजापूर, नळदुर्ग आणि मुरूम या चारही नगर परिषदांवर भाजपचा झेंडा फडकावला आहे. दुसरीकडे, या निकालामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

या निकालानंतर जिल्ह्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.

‘केवळ रिलस्टार असून चालत नाही’ – राणा पाटलांचा टोला

नगर परिषदांवर वर्चस्व मिळवल्यानंतर भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. निकालावर प्रतिक्रिया देताना राणा पाटील म्हणाले की, “राजकारणात केवळ ‘बोल बच्चन’गिरी करून आणि सोशल मीडियावर ‘रिलस्टार’ होऊन चालत नाही, तर लोकांसाठी जमिनीवर उतरून काम करावे लागते.” अशा शब्दांत त्यांनी खासदार निंबाळकरांना डिवचले आहे.

‘तुमचं कर्तृत्व काय?’ – ठाकरे गटाचे प्रत्युत्तर

राणा पाटलांच्या या टीकेचा शिवसेना (ठाकरे गट) प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी खरपूस समाचार घेतला आहे. पाटलांना प्रत्युत्तर देताना जाधवर म्हणाले की, “राणा पाटील यांनी विजयानंतर फार हवेत उडू नये. हे विजय तुमच्या नेतृत्वामुळे नव्हे, तर स्थानिक नेत्यांच्या ताकदीमुळे मिळाले आहेत.”

जाधवर यांनी निकालाचे विश्लेषण करताना स्थानिक नेत्यांची नावे घेतली. ते म्हणाले, “तुळजापूर पिटू गंगणे, नळदुर्ग सुनील चव्हाण, मुरूम बापूराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे तर धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि खलिफा कुरेशी (राष्ट्रवादी शरद पवार ) यांच्यात झालेल्या मत विभागणीमुळे भाजपचे कमळ फुलले आहे. . यात तुमचे स्वतःचे कर्तृत्व काय?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

या निकालामुळे धाराशिव जिल्ह्यातील भाजपची ताकद वाढली असली तरी, राणा पाटील आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्षामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Previous Post

धाराशिव नगर परिषद निवडणूक : भाजपचा मोठा विजय; नेहा काकडे नगराध्यक्षपदी, तर बहुतांश जागांवर भाजपचे वर्चस्व

Next Post

नवी मुंबई: तोतया पोलिसाचा बुरखा फाटला; तरुणीवर अत्याचार करणाऱ्याला १० वर्षांची सक्तमजुरी

Next Post
कळंब – चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या, पतीला जन्मठेप

नवी मुंबई: तोतया पोलिसाचा बुरखा फाटला; तरुणीवर अत्याचार करणाऱ्याला १० वर्षांची सक्तमजुरी

ताज्या बातम्या

‘११२’ च्या कॉलवर मदतीला धावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघात; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

‘११२’ च्या कॉलवर मदतीला धावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघात; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

April 18, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

वडगाव काटी येथे मध्यरात्री घरफोडी; पावणेतीन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

April 18, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

तेरखेड्यात बेकायदा तलवार बाळगल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा; येरमाळा पोलिसांची कारवाई

April 18, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

कळंब तालुक्यात संतापजनक घटना; चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

April 18, 2026
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

जन्मजात मृत स्त्री अर्भकाची कचऱ्याच्या पिशवीत विल्हेवाट; महिलेवर गुन्हा दाखल

April 18, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group