• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरीच्या घटना; दागिने, रोकड व दोन कालवडी लंपास

admin by admin
July 16, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव | धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर, मुरूम आणि वाशी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरीच्या तीन स्वतंत्र घटना घडल्या असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनांमध्ये सोन्याचे दागिने, रोकड तसेच दोन कालवडी असा एकूण सुमारे ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे.

तुळजापूरमध्ये घरफोडी

तुळजापूर येथील स्वास्तिक प्राईम कॉलनीतील रहिवासी भाग्यश्री अनिल कुलकर्णी (वय ४१) यांच्या बंद घराचे गेट उघडून दरवाजाची लॉकपट्टी तोडत चोरट्यांनी घरात प्रवेश केला. १२ जुलै रोजी दुपारी २.४५ ते १५ जुलै रोजी सकाळी ८.४५ या कालावधीत ही चोरी झाली. घरातील ५ ग्रॅम सोन्याचे दागिने व ३० हजार रुपयांची रोकड, असा ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. याप्रकरणी भाग्यश्री कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४), ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुरूममध्ये घरफोडी

उमरगा तालुक्यातील कोथळी येथील सचिन सिद्राम कुलकर्णी (वय २७) यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. १५ जुलै रोजी पहाटे ४ ते सकाळी ८ वाजण्यापूर्वी ही घटना घडली. घरातील ५ ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन गुंड्या, दोन साकळ्या आणि १० हजार रुपयांची रोकड, असा १९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. याप्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४), ३०५(ए), ६२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

वाशी तालुक्यात शेतातून दोन कालवडी चोरी

वाशी तालुक्यातील पारा शिवारात अज्ञात चोरट्यांनी शेतातून दोन कालवडी चोरून नेल्या. गोरख बलभिम भराटे यांची सुमारे १० हजार रुपये किंमतीची कालवड आणि नरहरी लिंबाजी ढेंगळे यांची ८ हजार रुपये किंमतीची कालवड, असा १८ हजार रुपयांचा ऐवज १४ जुलै रोजी पहाटे ३.३० ते ४.३० या वेळेत चोरीला गेला. गोरख भराटे यांच्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Previous Post

तुळजापूर पंचायत समितीत हायव्होल्टेज ड्रामा! थेट बीडीओंच्या दालनात पेट्रोल फेकले

Next Post

वारी मोजायची नसते, वारी पेरायची असते!

Next Post
वारी मोजायची नसते, वारी पेरायची असते!

वारी मोजायची नसते, वारी पेरायची असते!

ताज्या बातम्या

तुळजाभवानी मंदिर प्रकरण: भाजप नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना जिल्हाधिकाऱ्यांची ‘कारणे दाखवा’ नोटीस

तुळजाभवानी मंदिर प्रकरण: भाजप नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना जिल्हाधिकाऱ्यांची ‘कारणे दाखवा’ नोटीस

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजाभवानी मंदिर परिसरात चोरीच्या दोन घटना; दोन महिला ताब्यात

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात दोन विवाहित पुरुषांचे अपहरण; लोहारा आणि परंडा पोलिसांत गुन्हे दाखल

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

वाशी : टेम्पोतील कोऱ्या चेकवर खोटी सही करून लावला ८ लाखांचा चुना

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

अणदूर : बेकायदेशीर ताडीत (शिंदी) गुंगीचे औषध मिसळल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

October 16, 2026

Recent Posts

  • तुळजाभवानी मंदिर प्रकरण: भाजप नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना जिल्हाधिकाऱ्यांची ‘कारणे दाखवा’ नोटीस
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात चोरीच्या दोन घटना; दोन महिला ताब्यात
  • धाराशिव जिल्ह्यात दोन विवाहित पुरुषांचे अपहरण; लोहारा आणि परंडा पोलिसांत गुन्हे दाखल
  • वाशी : टेम्पोतील कोऱ्या चेकवर खोटी सही करून लावला ८ लाखांचा चुना
  • अणदूर : बेकायदेशीर ताडीत (शिंदी) गुंगीचे औषध मिसळल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!