• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, June 2, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे सत्र सुरूच; घरफोडीसह दुचाकी, जनावरे आणि कृषीपंप लंपास

admin by admin
December 29, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
206
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी/नळदुर्ग/कळंब/ढोकी: जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, एकाच दिवशी चार वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये घरफोडी करून धान्य व दागिने, शेतकऱ्यांची जनावरे, दुचाकी आणि शेतातील सोलर मोटार चोरल्याच्या घटनांचा समावेश आहे.

१. वाशी: बंद घर फोडून धान्य व चांदीचे पैंजण लंपास

वाशी तालुक्यातील पारगाव येथे बंद घराच्या खिडकीचा दरवाजा उघडून चोरी झाल्याची घटना घडली आहे. फिर्यादी वच्छला लक्ष्मण वंजारे (वय ६५, सध्या रा. हातोला, ता. वाशी) यांचे पारगाव येथे घर आहे. दिनांक २१ ते २७ डिसेंबर दरम्यान अज्ञात चोरांनी खिडकीवाटे प्रवेश करून घरातील गव्हाचे कट्टे, सोयाबीनचा एक कट्टा, रेशनचा तांदूळ आणि एक चांदीचे पैंजण असा एकूण १४,६०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२. नळदुर्ग: हिप्परगा तांडा येथून जनावरे चोरीला

नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिप्परगा तांडा शिवारामध्ये शेतकऱ्याच्या गोठ्यातून जनावरे चोरीला गेली आहेत. किशोर बलभीम ढाले (वय ३०) यांच्या शेतातून २५ डिसेंबरच्या रात्री ते २६ डिसेंबरच्या सकाळदरम्यान अज्ञात चोरांनी दोन म्हैस, एक रेडकू आणि एक बोकड असा एकूण ६३,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

३. कळंब: घरासमोरून दुचाकी गायब

कळंब शहरातील परळी बायपास रोडवर राहणारे बळीराम लिंबाजी चव्हाण (वय ३९) यांची हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल (क्र. एमएच २५, एएक्स ४९८९) त्यांच्या घरासमोर उभी होती. २३ डिसेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्याने ही ३०,००० रुपये किमतीची गाडी चोरून नेली. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

४. ढोकी: शेतातील सोलर मोटार चोरली

ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेड शिवारात शेती साहित्य चोरीला गेले आहे. प्रभाकर दत्तात्रय घोगरे (वय ८१, रा. उपळा) यांच्या गट नं. ४०८ मधील विहिरीवरील १८,००० रुपये किमतीची सोलर ऊर्जेची मोटार आणि २०० फूट केबल अज्ञात चोरांनी लंपास केली. ही घटना ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान घडली असून, आता २८ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

नळदुर्ग : तलवार आणि लोखंडी रॉडने कुटुंबावर प्राणघातक हल्ला; कार्ला येथील थरार, १० जणांवर गुन्हा दाखल

Next Post

हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाजी उरुस काळात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना करा

Next Post
हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाजी उरुस काळात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना करा

हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाजी उरुस काळात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना करा

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिवमध्ये मिरवणुकीत कानठळ्या बसवणाऱ्या ‘डॉल्बी डीजे’वर पोलिसांची कारवाई; सोलापूरच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 2, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर बसस्थानकावर पुन्हा धाडसी चोरी! नांदेड बसमध्ये चढताना सोलापूरच्या महिला भाविकाचे ५० हजारांचे मिनीगंठण लंपास

June 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तालुक्यात दोन ठिकाणी टोळक्यांचा राडा! लग्नाच्या कार्यक्रमात बिअरची बाटली अन् लोखंडी पाईपने मारहाण; १४ जणांवर गुन्हे दाखल

June 2, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धक्कादायक! धाराशिवमध्ये लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर ७ वर्षे अत्याचार; जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी

June 2, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

वाशी तालुक्यात विजोरा शिवारात पोलिसांची मोठी कारवाई; पत्राच्या शेड शेजारील कडब्याखाली लपवलेली तलवार जप्त, एकावर गुन्हा दाखल

June 1, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group