• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, August 8, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘माझ्या गाडीला का ठोकले?’ म्हणत काटगावात व्यक्तीला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

admin by admin
January 20, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग: गाडीला समोरून धडक दिल्याचा जाब विचारत एका व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे घडला आहे. या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक बाबुराव वर्दे (वय ४५, रा. काटगाव, ता. तुळजापूर) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी अंबिका अशोक वर्दे (वय ३७) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास काटगाव येथील लोकमंगल बँकेच्या बाजूला असलेल्या सिद्धू कस्तुरे यांच्या मोकळ्या जागेत घडली. आरोपी रमेश सुभाष गंगणे, राजू सुभाष गंगणे, सुभाष गंगणे आणि रेणुका गंगणे (सर्व रा. काटगाव) यांनी अशोक वर्दे यांना अडवले. “तू माझ्या गाडीला समोरून ठोकले,” असे म्हणत आरोपींनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर आरोपींनी वर्दे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच दगडाने मारून गंभीर जखमी केले. यावेळी त्यांना जीवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली.

या घटनेनंतर जखमीच्या पत्नी अंबिका वर्दे यांनी नळदुर्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वरील चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२) (स्वेच्छेने दुखापत करणे), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. नळदुर्ग पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

Previous Post

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह चौघांवर भूम पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post

दारूच्या नशेत वृद्धांना मारहाण करून घर पाडले; शेलगाव येथील घटना, ७ जणांवर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

दारूच्या नशेत वृद्धांना मारहाण करून घर पाडले; शेलगाव येथील घटना, ७ जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

August 8, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापुरात रेल्वे मार्गाच्या मोबदल्यावरून तुफान हाणामारी!

August 8, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम रोखले! कनिष्ठ अभियंत्याला धमकी देऊन शासकीय कामात अडथळा

August 8, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

वाशी शहरात अनैतिक संबंध अन् पैशांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या!

August 8, 2026
पवनचक्कीचे साहित्य चोरणारी सराईत टोळी गजाआड; चार आरोपींना बेड्या

पवनचक्कीचे साहित्य चोरणारी सराईत टोळी गजाआड; चार आरोपींना बेड्या

August 8, 2026

Recent Posts

  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
  • तुळजापुरात रेल्वे मार्गाच्या मोबदल्यावरून तुफान हाणामारी!
  • तुळजापूर तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम रोखले! कनिष्ठ अभियंत्याला धमकी देऊन शासकीय कामात अडथळा
  • वाशी शहरात अनैतिक संबंध अन् पैशांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या!
  • पवनचक्कीचे साहित्य चोरणारी सराईत टोळी गजाआड; चार आरोपींना बेड्या
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!