• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, August 8, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजाभवानी मंदिरात भक्तांची लूट? दानपेटीत चुकून पडलेले दागिने परत मिळणार नाहीत; संस्थानचा अजब कारभार

admin by admin
January 21, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
 ‘धाराशिव लाइव्ह’च्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट; शेलारांच्या बैठकीच्या यादीत अखेर बदल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येणाऱ्या भाविकांची मंदिर प्रशासनाकडून एक प्रकारे लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. “दानपेटीत चुकून पडलेली कोणतीही मौल्यवान वस्तू परत मिळणार नाही, ती वस्तू दान समजली जाईल,” असा अजब ठराव मंदिर संस्थानने मंजूर केला असून, याचा मोठा फटका पिंपरी-चिंचवडमधील एका भाविकाला बसला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पिंपरी-चिंचवड येथील एक भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आला होता. यावेळी पैसे अर्पण करताना त्यांच्या हातातील एक तोळ्याची सोन्याची अंगठी चुकून दानपेटीत पडली. आपली चूक लक्षात येताच या भाविकाने मंदिर प्रशासनाशी संपर्क साधला.

सदर भाविकाने अंगठीचा फोटो आणि ती नेमकी कोणत्या दानपेटीत पडली, याची अचूक माहिती प्रशासनाला दिली. सत्यता पडताळून आपली वस्तू परत मिळावी, यासाठी त्यांनी रीतसर अर्जही केला. मात्र, दोन महिने उलटून गेल्यानंतरही मंदिर प्रशासनाने त्यांना अंगठी परत करण्यास नकार दिला आहे.

मंदिराचा अजब न्याय!

भाविकाने विनंती करूनही मंदिर संस्थानने त्यांचा अर्ज निकाली काढला आहे. संस्थानच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या ठरावात स्पष्ट नमूद आहे की, दानपेटीत एकदा पडलेली वस्तू (चुकून का असेना) ती देवास अर्पण झाली असे मानले जाईल आणि ती परत दिली जाणार नाही.

मात्र, देवीच्या दरबारात श्रद्धेने येणाऱ्या भक्तांची अशा प्रकारे अडवणूक करणे आणि चुकून पडलेल्या वस्तूंवर हक्क सांगणे म्हणजे भाविकांची लूटच असल्याची भावना व्यक्त होत आहे. तुळजाभवानी देवीच्या दरबारातील या ‘अजब कारभारा’वर आता भक्तांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Previous Post

कत्तलीसाठी जनावरांची निर्दयतेने वाहतूक; पारगाव टोल नाक्यावर वाशी पोलिसांची कारवाई, १३ जनावरांची सुटका

Next Post

धाराशिव जिल्हा परिषद: महाविकास आघाडीसह ‘वंचित’ व ‘रासप’ एकत्र; महायुतीत मात्र जागावाटपावरून ठिणगी!

Next Post
धुरळा धाराशिवचा: नवऱ्यांची धावपळ अन्‌ बायकांची ‘खुर्ची’साठी धडपड!

धाराशिव जिल्हा परिषद: महाविकास आघाडीसह 'वंचित' व 'रासप' एकत्र; महायुतीत मात्र जागावाटपावरून ठिणगी!

ताज्या बातम्या

‘सायलेंट किलर’ दत्ताभाऊंचा मास्टरस्ट्रोक; ‘बडे सरकार’ आऊट, ‘छोटे सरकार’ इन, अन् साहेबांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार!

‘सायलेंट किलर’ दत्ताभाऊंचा मास्टरस्ट्रोक; ‘बडे सरकार’ आऊट, ‘छोटे सरकार’ इन, अन् साहेबांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार!

August 8, 2026
‘मल्हार पर्वा’चा पहिला बळी, काकडेंची विकेट अन् ‘प्रायव्हेट लिमिटेड’चे पंख छाटायला सुरुवात!

‘मल्हार पर्वा’चा पहिला बळी, काकडेंची विकेट अन् ‘प्रायव्हेट लिमिटेड’चे पंख छाटायला सुरुवात!

August 8, 2026
धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा : कोणते अधिकारी निलंबित?

धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा: आणखी २० अधिकाऱ्यांवर खातेनिहाय चौकशीची टांगती तलवार

August 8, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

मोडक्या शाळा, तडफडणारे रुग्ण आणि ‘व्हिजन २०३०’ च्या नावाखाली नेत्यांना हवीत दीड कोटींची ‘नवी कोरी’ वाहने!

August 8, 2026
धाराशिव पीक विमा: उच्च न्यायालयाच्या निकालाने शेतकऱ्यांना धक्का, कंपनीला दिलासा

उच्च न्यायालयाच्या आदेशालाच महसूल यंत्रणेचा ठेंगा: शेतकऱ्यांकडून मोठ्या रकमेची मागणी

August 8, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!