• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, August 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

सोलापूर-धुळे महामार्गावर वाहने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

admin by admin
January 22, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
सोलापूर-धुळे महामार्गावर वाहने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना अडवून लुटणाऱ्या आणि चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ८ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी ट्रक चालक रामजी शोभनाथ यादव हे सोलापूर-धुळे हायवेवरून आपल्या कंटेनरमधून नवीन टायर्स घेऊन जात होते. दरम्यान, तेरखेडा जवळील लक्ष्मी पारधी पिढी परिसरात त्यांच्या कंटेनरमधील नवीन टायर्सची चोरी झाली होती. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांनी तपासाचे आदेश दिले होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक पेट्रोलिंग करत असताना, त्यांना गुप्त माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अनिल मच्छींद्र पवार (रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा) हा तेरखेडा गावात चोरीच्या दुचाकीसह आला आहे. पोलिसांनी तत्काळ सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने शिताफीने त्याला आणि त्याचा साथीदार नाना तानाजी शिंदे (रा. भिकारसारोळा, जि. धाराशिव) याला ताब्यात घेतले.

अनेक गुन्ह्यांची कबुली आणि मुद्देमाल जप्त

पोलिसांनी दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी आपल्या इतर दोन साथीदारांच्या मदतीने कंटेनरमधील टायर्स चोरल्याचे मान्य केले. तसेच पानगाव येथे चोरी केल्याचे आणि वाशी, बेंबळी, येरमाळा व भादा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकली चोरल्याचेही उघडकीस आले.

पोलिसांनी आरोपींनी लपवून ठेवलेला मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे:

  • २९ नवीन टायर्स

  • ०४ चोरीच्या मोटारसायकली

  • गुन्ह्यात वापरलेली एक चारचाकी गाडी

  • रोख रक्कम

असा एकूण ८,२८,६५९ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. विनोद इज्जपवार यांच्या आदेशाने सपोनि सचिन खटके, हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, महबूब अरब आणि रोहित दंडनाईक यांच्या पथकाने केली.

Previous Post

“मी पेपर फोडणार नाही…!” राणा पाटलांची गुगली; नवरा म्हणतो ‘वेट अँड वॉच’, पोरगं म्हणतं ‘गेम ओव्हर’!

Next Post

‘त्यागमूर्ती’चा मुखवटा आणि भाजपचा ‘नियम’! अर्चना पाटलांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ नेमकं कुणी केला?

Next Post
धाराशिव जिल्हा परिषद: अर्चना पाटील यांची मोठी खेळी; दोन गटांतून उमेदवारी अर्ज दाखल, अध्यक्षपदावर प्रबळ दावेदारी?

'त्यागमूर्ती'चा मुखवटा आणि भाजपचा 'नियम'! अर्चना पाटलांचा 'करेक्ट कार्यक्रम' नेमकं कुणी केला?

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

उपनगराध्यक्ष पदाचा घोळ, नाकापेक्षा जड मोती आणि १४० कोटींच्या पंचपक्वान्नात नगरसेवक उपाशी!

August 7, 2026
१२ वाड्यांचा धनी ते दत्तक पाटील!

नियतीचा खेळ आणि संघाची खेळी: एका राजकीय वर्चस्वाची ‘इनसाईड स्टोरी’

August 7, 2026
पंतप्रधान मोदींची भेट घेत ओमराजे निंबाळकरांनी मांडल्या धाराशिवच्या विकासाच्या मागण्या

घर फिरलं की वासे फिरतात! ओमराजेंची ‘दिल्लीवारी’ अन् राणा पाटलांची ‘दुहेरी कात्री’!

August 7, 2026
पंतप्रधान मोदींची भेट घेत ओमराजे निंबाळकरांनी मांडल्या धाराशिवच्या विकासाच्या मागण्या

पंतप्रधान मोदींची भेट घेत ओमराजे निंबाळकरांनी मांडल्या धाराशिवच्या विकासाच्या मागण्या

August 7, 2026
राणा पाटील आणि त्यांच्या ‘बगलबच्चांना’ मुंबई आणि दिल्लीतून एकाच दिवशी दोन मोठे हादरवणारे झटके!

राणेंचा ४ तासांचा ‘लेटमार्क’, बांधावरचे ‘नाट्य’ आणि निष्ठावंतांच्या तोंडाला थेट पाने!

August 7, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!