तुळजापूर :आरोपी नामे-दाजी निवृत्ती माने, रा. शिराढोण, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 12.01.2024 रोजी 14.00 वा. सु. सज्जा कार्यालय मातोश्री लॉज शेजारी तुळजापूर येथे फिर्यादी नामे- गजानन नारायण कांबळे, वय 54 वर्षे, व्यवसाय- तलाठी सज्जा सिंदफळ अतिरिक्त कार्यभार तडवळा व बोरी रा. प्रतिक्षा नगर कदम हॉस्पीटल च्या पाठीमागे जाणारे रोडव्र तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे शासकीय कामकाज करत असताना नमुद आरोपी हा दारु पिवून आला फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन लॅपटॉपचा डीएससी व पेनड्राईव्ह हिसकावून घेवून शासकिय कमात अडथळा निर्माण करुन निघून गेला. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे-गजानन कांबळे यांनी दि.17.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 353,332, 327, 504,506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मोटरसायकल अपघातात एक ठार
तुळजापूर : आरोपी नामे- दत्तात्रय ईश्वर कांबळे, व सोबत मयत नामे- रोहीत साहेबराव गायकवाड, वय 25 वर्षे, दोघेही रा. मसला खुर्द ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.24.12.2023 रोजी 18.30 वा. सु. एस के धाब्याजवळ एनएच 52 हायवे रोडवरुन मोटरसायकलवर जात होते. दरम्यान नमुद आरोपी दत्तात्रय कांबळे यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजीपणे चालवून समोर कुत्रे आडवे आल्याने अचानक ब्रेक मारल्याने मोटरसायकल स्लिप होवून आरोपी नामे- दत्तात्रय कांबळे व रोहीत गायकवाड हे गाडीवरुन खाली पडून रोहती गायकवाड हा गंभीर जखमी होवून मयत झाला. तर दत्तात्रय कांबळे हा किरकोळ जखमी झाला. अशा मजकुराच्या मयताचा भाउ नामे- रवी साहेबराव गायकवाड, वय 27 वर्षे, रा. मसला खुर्द, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.17.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, ,337, 338, 304(अ) सह 184, मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.