भूम : चारित्र्याचा संशय घेतल्याने बायकोने दिराच्या मदतीने नवऱ्याचा खून निर्घृण खून केल्याची घटना भूम तालुक्यातील पाटसांगवी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
मयत मयत नामे- भगवान भरत मिसाळ हा पत्नी योगिता भगवान मिसाळ हीचा चारित्र्यावर संशय घेऊन छळ करून मारहाण करीत होता. त्यामुळे आरोपी नामे-1) योगिता भगवान मिसाळ, 2) रविराज भगवान मिसाळ दोघे रा. पाटसांगवी ता. भुम जि. धाराशिव व इतर दोन अनोळखी इसम यांनी दि. 16.01.2024 रोजी 21.30 वा. सु. मयताचे घराचे पाठीमागे पाटसांगवी शिवार येथे मयत नामे- भगवान भरत मिसाळ, वय 35 वर्षे, रा. पाटसांगवी ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी संगणमत करुन यातील मयत यास शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लाकडी काठ्याने मारहाण करुन जिवे ठार मारले.आशा मजकुराच्या मयताची बहिण फिर्यादी नामे- रेखा तुकाराम गुंड, वय 40 वर्षे, रा. तपनेश्वर गल्ली जामखेड ता. जि. अहमदनगर यांनी दि.17.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे कलम 302, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
अणदूरमध्ये मारहाण
नळदुर्ग :आरोपी नामे-1)लक्ष्मण निलाप्पा घोडके, 2) शिवाजी लक्ष्मण घोडके, 3) निलकंठ लक्ष्मण घोडके, 4) रेखा लक्ष्मण घोडके, 5) लक्ष्मी निळकंठ घोडके, 6) सत्यभामा शिवाजी घोडके, सर्व रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी यांनी दि. 17.01.2024 रोजी 16.00 वा. सु. चिवरी शिवारातील शेतात फिर्यादी नामे-प्रविण प्रकाश घोडके, वय 35 वर्षे रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव, यांना नमुद आरोपीने गैरकायद्याची मंडळी जमवून शेतीच्या वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, सळई, काठी, दगडाने मारहाण करुन जखमी जखमी केले. तसेच फिर्यादीचे भाउ सतिश घोडके व भरत घोडके यांनाही नमुद आरोपींने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, सळई, काठीने मारहण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रविण घोडके यांनी दि.17.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 325, 324, 323, 504, 506,143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी :आरोपी नामे-,1) ऋषीकेश मधुकर यादव, 2) योगेश मधुकर यादव, 3) मधुकर यादव, 4) बबीता मधुकर यादव सर्व रा.लासोना ता. जि. धाराशिव यांनी दि.17.01.2024 रोजी 19.30 वा. सु. लासोना येथे फिर्यादी नामे-मनोहर नंदकुमार यादव, वय 35 वर्षे रा. लासोना, ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने बोरचे पाईप लाईनचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी कड्याने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीची पत्नी व भाउ यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मनोहर यादव यांनी दि.17.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.