नळदुर्ग : मयत नामे-प्रकाश साहेबराव डोंगरे, रा. बाबुलतार, ता. पाथरी जि. परभणी यांनी दि. 07.10.2023 रोजी 04.30 ते 06.00 वा. सु. ईटकळ येथे गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे- कृष्णा परमेश्वर कांदे, 2) अमोल परमेश्वर कांदे, 3) गोविंद कांदे सर्व रा. रेवली, ता. परळी जि. बीड यांनी संप्टेबर 2023 ते दि.07.10.2023 रोजी पर्यंत मयत प्रकाश डोंगरे यांचा मुलगा महेंद्र डोंगरे यास उस तोडण्यासाठी तीन लाख तीस हजार रुपये दिले होते. परंतु महेंद्र डोंगरे हा पुणे गेल्याने नमुद आरोपी हे मयत प्रकाश डोंगरे यांना सतत तुझा मुलगा कारखाना सुरु होण्याअगोदर ट्रॅक्टरवर आला पाहीजे असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन धमकी दिल्याने त्यांचे जाचास व त्रासास कंटाळून प्रकाश डोंगरे यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराचा मयताची पत्नी- सुनिता प्रकाश डोंगरे, वय 45 वर्षे, रा. बाबुलतार ता. पाथरी जि. धाराशिव यांनी दि. 21.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.दं.वि. सं. कलम- 306, 323 504,506, 34 सह अ.जा.ज.अ.प्र. कायदा कलम 3(1)(आर), 3(1)(एस), 3(2))व्हिए), 3(2)(व्हि) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उसाला आग लावून नुकसान
नळदुर्ग :आरोपी नामे-1)महादेव राम माळी, रा. काटगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 20.01.2024 रोजी 19.30 वा. सु. काटगाव शिवारात शेत गट नं 253/ब/3 मधील फिर्यादी नामे-अविनाश जगन्नाथ म्हेत्रे, वय 62 वर्षे, रा. काटगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे व मदन किसन माळी, उज्वला नामदेव माळी या तिघांचे उसाला आग लावून धमकी देवून उसाला आग लावून उसाचे नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अविनाश म्हेत्रे यांनी दि.21.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 435, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बसमध्ये चढत असताना दागिन्यांची चोरी
नळदुर्ग : फिर्यादी नामे-अंजुम शहाबाज शेख, वय 30 वर्षे, रा. निलेगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव, या दि. 20.01.2024 रोजी 12.15 वा. सु. नळदुर्ग बसस्थानक येथे धाराशिव हैद्राबाद बसमध्ये चढत असताना अंदाजे 1,25,000 ₹ किंमतीचे 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हे अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अंजुम शेख यांनी दि.21.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.