• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

परंड्यात चाकूचा धाक दाखवून ज्येष्ठ महिलेला लुटले; भरदिवसा घडलेल्या घटनेने खळबळ, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
March 17, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: शेतात कामाला बोलावून महिलेवर अत्याचार, तरुणावर गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा : शेताकडे पायी जात असलेल्या एका ६३ वर्षीय ज्येष्ठ महिलेचे तोंड दाबून तसेच चाकू आणि दगडाचा धाक दाखवून भरदिवसा लुटल्याची धक्कादायक घटना परंडा तालुक्यातील सोनगिरी शिवारात घडली. याप्रकरणी तीन अज्ञात दुचाकीस्वारांवर परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रमिला भगवान आगरकर (वय ६३, रा. आगरकर गल्ली, परंडा, जि. धाराशिव) असे लुटण्यात आलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. १६) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास प्रमिला आगरकर या सोनगिरी शिवारातील कृषी विभागाच्या हद्दीतून आपल्या शेताकडे पायी चालत जात होत्या.

यावेळी अचानक एका मोटारसायकलवरून तीन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. या तिघांनी प्रमिला यांना अडवले आणि आरडाओरडा करू नये म्हणून त्यांचे तोंड दाबले. त्यानंतर आरोपींनी त्यांना दगडाने आणि चाकूने मारण्याची धमकी दिली. जिवाच्या भीतीने घाबरलेल्या प्रमिला यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी असलेले मंगळसूत्र आणि कानातील फुले असा एकूण आठ ग्रॅम वजनाचा आणि १६ हजार रुपये किमतीचा ऐवज या चोरट्यांनी बळजबरीने हिसकावून नेला आणि तेथून पोबारा केला.

हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर प्रमिला आगरकर यांनी परंडा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरीवरून परंडा पोलिसांनी सोमवारी (ता. १६) तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(४), ३(५) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परंडा परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस या लुटारूंचा कसून शोध घेत आहेत.


Previous Post

शिवीगाळ का करतोस विचारल्याच्या रागातून तरुणावर तलवारीने हल्ला; कोळेवाडीतील घटना, चौघांवर गुन्हा दाखल

Next Post

धाराशिव जिल्ह्यात मटका अड्ड्यांवर पोलिसांची धडक कारवाई; नळदुर्ग, तुळजापूरसह चार ठिकाणी छापे, सात जणांवर गुन्हे दाखल

Next Post
वाखरवाडीच्या समाज मंदिरातच जुगाराचा अड्डा; ढोकी पोलिसांच्या छाप्यात नऊ जण ताब्यात

धाराशिव जिल्ह्यात मटका अड्ड्यांवर पोलिसांची धडक कारवाई; नळदुर्ग, तुळजापूरसह चार ठिकाणी छापे, सात जणांवर गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

दुष्काळी पाहणी की फार्स?

दुष्काळी पाहणी की फार्स?

September 23, 2026
“त्यांचं मी तोंडही पाहत नाही, ती प्रवृत्तीच…”; मुख्यमंत्र्यांच्या गाडीतील प्रवासानंतर ओमराजेंचा राणा पाटलांवर घणाघात

“त्यांचं मी तोंडही पाहत नाही, ती प्रवृत्तीच…”; मुख्यमंत्र्यांच्या गाडीतील प्रवासानंतर ओमराजेंचा राणा पाटलांवर घणाघात

September 23, 2026
धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर

धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर

September 23, 2026
धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

September 22, 2026
देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

September 22, 2026

Recent Posts

  • दुष्काळी पाहणी की फार्स?
  • “त्यांचं मी तोंडही पाहत नाही, ती प्रवृत्तीच…”; मुख्यमंत्र्यांच्या गाडीतील प्रवासानंतर ओमराजेंचा राणा पाटलांवर घणाघात
  • धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर
  • धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली
  • देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!