• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, March 19, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

सुविधा हॉस्पिटल परिसरातील थरार : किरकोळ वादातून तरुणावर शस्त्रांनी जीवघेणा हल्ला; १४ जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
March 19, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
3k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: किरकोळ अपघाताच्या कारणावरून झालेल्या वादातून १४ जणांच्या टोळक्याने एका तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी आलेल्या त्याच्या नातेवाईकांवर तलवार, कोयता, चाकू आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना धाराशिव शहरातील सुविधा हॉस्पिटल परिसरात घडली. या हल्ल्यात फिर्यादी तरुण गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिकेत ऊर्फ आप्पा प्रतापसिंह शेंडगे (वय २६, रा. जुना रेल्वे स्टेशन रोड, मुकुंदनगर, धाराशिव) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. १३) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अनिकेत शेंडगे हा सुविधा हॉस्पिटल परिसरात होता. त्यावेळी किरकोळ अपघाताच्या कारणावरून वाद उफाळून आला. यातून आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून अनिकेतला गाठले. सुरुवातीला शिवीगाळ करत त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर संतापलेल्या टोळक्याने सोबत आणलेले कोयता, तलवार, लोखंडी रॉड, फर्शीचे तुकडे, टॉमी आणि चाकू यांसारख्या घातक शस्त्रांनी अनिकेतवर सपासप वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडले.

अनिकेतला मारहाण होत असल्याचे पाहून त्याला वाचवण्यासाठी त्याचे मामा प्रदीप मुंढे यांच्यासह मित्र सुजित मुंढे, व्यंकटेश मुंढे आणि सुशांत जाधव हे मध्ये पडले. मात्र, संतप्त जमावाने त्यांनाही बेदम मारहाण केली व सर्वांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी अनिकेत शेंडगे याने रुग्णालयातून दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून आनंदनगर पोलिसांनी बुधवारी (ता. १८) सनी चंद्रकांत पवार, श्रीराज चंद्रकांत पवार, धनराज चंद्रकांत पवार, सतीश विठ्ठल पवार, रमेश विठ्ठल पवार, संदीप नानासाहेब पवार, रत्नदीप बाळासाहेब पवार, प्रणील विलास रणखांब, संग्राम प्रकाश पवार, मंगेश भोसले, प्रकाश पवार, मल्हार सर्जेराव पवार, रितेश रमेश पवार आणि ओंकार उमेश पवार (सर्व रा. धाराशिव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(३), १८९(२), १९१(२), १९० तसेच शस्त्र अधिनियम ४/२५ व मपोका कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


Previous Post

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन: कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध अटक वॉरंट

Next Post

जमिनीच्या वादातून तरुणास पाईप आणि काठीने बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

जमिनीच्या वादातून तरुणास पाईप आणि काठीने बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

जमिनीच्या वादातून तरुणास पाईप आणि काठीने बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

March 19, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

सुविधा हॉस्पिटल परिसरातील थरार : किरकोळ वादातून तरुणावर शस्त्रांनी जीवघेणा हल्ला; १४ जणांवर गुन्हा दाखल

March 19, 2026
धाराशिव पीक विमा: उच्च न्यायालयाच्या निकालाने शेतकऱ्यांना धक्का, कंपनीला दिलासा

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन: कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध अटक वॉरंट

March 19, 2026
भाजप प्रवेशानंतर परतताना धनंजय सावंत यांच्या गाडीला भीषण अपघात; सुदैवाने बचाव

भाजप प्रवेशानंतर परतताना धनंजय सावंत यांच्या गाडीला भीषण अपघात; सुदैवाने बचाव

March 19, 2026
धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी

धाराशिव: आर्थिक तडजोड करून गाडी सोडल्याचा आरोप; पोलीस कर्मचाऱ्याचे वर्तन संशयास्पद असल्याचा अहवाल, मात्र अद्याप कारवाई नाही!

March 18, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group