• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, May 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘ऑर्डर घ्यायला किती वेळ लागणार?’ विचारल्याचा राग; कळंबमध्ये ग्राहकांवर चाकू आणि बिअरच्या बाटलीने जीवघेणा हल्ला

admin by admin
March 27, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
1.3k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब: हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या ग्राहकांनी ‘जेवणाची ऑर्डर घ्यायला किती वेळ लागेल?’ अशी साधी विचारणा केली असता, त्यांना थेट चाकू, बिअरची बाटली आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना कळंब शहरातील केज रोडवरील हॉटेल प्रेरणा येथे घडली आहे. याप्रकरणी बार्शी येथील एका कुटुंबातील पाच जणांना गंभीर दुखापत झाली असून, कळंब पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर सुभाष साळुंखे (वय ३१ वर्षे, रा. रामेश्वर मंदिराजवळ, भवानी पेठ, कुर्डूवाडी रोड, बार्शी, जि. सोलापूर) हे आपले चुलते मनोज साळुंखे, बलभीम साळुंखे, गणेश साळुंखे आणि विजय साळुंखे यांच्यासह १४ मार्च २०२६ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कळंब येथील केज रोडवर असलेल्या ‘प्रेरणा हॉटेल’मध्ये जेवणासाठी गेले होते. हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांनी ‘जेवणाची ऑर्डर द्यायला किती वेळ लागेल?’ अशी विचारणा केली.

मात्र, एवढ्याशा कारणाचा राग आल्याने आरोपी अभिषेक मुंडे, सागर मुंडे, ओंकार मुंडे, भैय्या सगरे, सुमित मोदी आणि आणखी एका अज्ञात व्यक्तीने साळुंखे कुटुंबीयांशी थेट हुज्जत घातली.

वाद वाढल्यानंतर या सहाही जणांनी मिळून सागर साळुंखे आणि त्यांच्या चुलत्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी ग्राहकांवर चाकू, बिअरची बाटली आणि लाकडी दांडक्याने सपासप वार करत त्यांना गंभीर जखमी केले.

या भयंकर प्रकारानंतर, फिर्यादी सागर साळुंखे यांनी गुरुवारी (दि. २६ मार्च) कळंब पोलीस ठाण्यात धाव घेत रीतसर तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अभिषेक मुंडे, सागर मुंडे, ओंकार मुंडे, भैय्या सगरे, सुमित मोदी आणि एका अनोळखी व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११९(२), ११५(२), ३५२, ३२४(४), १८९(१), १८९(२), १८९(४), १९०, १९१(१), १९१(२) आणि १९१(३) अन्वये गंभीर गुन्हा दाखल केला आहे. या क्षुल्लक कारणावरून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


Previous Post

‘तक्रार मागे घेण्यासाठी १० लाख दे’, तरुणाला दुचाकीची धडक देऊन झाडाला बांधून बेदम मारहाण; भूममधील सोनगिरी येथील धक्कादायक प्रकार

Next Post

बाऊन्सरच्या गराड्यात धाराशिव जिल्हा परिषद सभापतींची निवड; महायुतीचा चारही जागांवर झेंडा

Next Post
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

बाऊन्सरच्या गराड्यात धाराशिव जिल्हा परिषद सभापतींची निवड; महायुतीचा चारही जागांवर झेंडा

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

रांजणीत सालगड्यानेच केला विश्वासघात; मालकाचे सव्वाचार लाख रुपये घेऊन पोबारा

May 25, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

मळगीवाडीत शेतातील माती टाकण्याच्या वादातून वृद्धेला बेदम मारहाण

May 25, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

‘हॉर्न का वाजवला?’ म्हणत दाम्पत्याला लुटले; उमरगा चौरस्त्यावरील धक्कादायक घटना

May 25, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापुरात किरकोळ वादातून दोघांवर चाकू हल्ला; बोंबले चौकातील घटनेने खळबळ, एकावर गुन्हा दाखल

May 24, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरग्यात ‘वंचित’च्या कार्यालयात घुसून पदाधिकाऱ्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला; शहरात खळबळ

May 24, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group