• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

महामार्गावर चालत्या वाहनांतून चोरी करणारी टोळी २४ तासांत गजाआड; धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

admin by admin
April 2, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
महामार्गावर चालत्या वाहनांतून चोरी करणारी टोळी २४ तासांत गजाआड; धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : रात्रीच्या अंधारात महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांतून शिताफीने सामानाची चोरी करणाऱ्या एका सराईत टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला आहे. इंदापूर ते वाशी रस्त्यावर चालत्या पिकअपमधून तेलाचे डबे चोरणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून चोरीचा माल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक धाराशिव शहरात मालमत्तेविषयीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, इंदापूर ते वाशी जाणाऱ्या रोडवर एका चालत्या पिकअपमधून काही जणांनी तेलाचे डबे चोरले आहेत आणि हा माल संतोष राजेंद्र शिंदे (रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा) याने त्याच्या घरी लपवून ठेवला आहे.

या माहितीच्या आधारे पथकाने संतोष शिंदे याचा शोध सुरू केला असता तो येरमाळा येथे मिळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन घटनेबाबत चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आपण आणि आपले साथीदार पापा शंकर पवार (रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा) व आकाश देवीदास शिंदे (रा. पारा) अशा तिघांनी मिळून रात्रीच्या वेळी चालत्या पिकअपमध्ये चढून तेलाचे ४ डबे चोरल्याचे त्याने सांगितले.

आरोपीच्या माहितीवरून पोलिसांनी त्याच्या घरातून ८,९६० रुपये किमतीचे तेलाचे ४ डबे आणि गुन्ह्यात वापरलेली रेडीऑन कंपनीची मोटारसायकल (चेसी नं. MD625BK627MIA01176) असा एकूण ६३,९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी वाशी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर आणि चालक पोलीस अमंलदार रोहीत दंडनाईक यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

Previous Post

धाराशिव: बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत ६५ वर्षीय वृद्धेचे ४५ हजारांचे दागिने लांबवले; २० वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल

Next Post

तुळजापुरात भाविकांना अमानुष मारहाण; डीवायएसपी निलेश देशमुख यांच्या तात्काळ निलंबनाची आमदार कैलास पाटील यांची मागणी

Next Post
तुळजापुरात खाकी वर्दीचा माज! देवीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना पोलिसांची अमानुष मारहाण; महिलांनाही धक्काबुक्की

तुळजापुरात भाविकांना अमानुष मारहाण; डीवायएसपी निलेश देशमुख यांच्या तात्काळ निलंबनाची आमदार कैलास पाटील यांची मागणी

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी

October 17, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून

October 17, 2026

Recent Posts

  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
  • उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला
  • खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला
  • जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी
  • भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!