• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव: शेतमालकाच्या जातीवाचक शिवीगाळ व जाचाला कंटाळून दलित तरुणाची आत्महत्या

admin by admin
April 14, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: शेतमालकाने केलेल्या सततच्या जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक छळाला कंटाळून एका २३ वर्षीय दलित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना धाराशिव तालुक्यातील उपळे (माकडाचे) येथे घडली आहे. प्रमोद मनोज अवधुते असे मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी आनंदनगर पोलिसांनी शेतमालकावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रमोद अवधुते हा मागील १० महिन्यांपासून गावातीलच शेतमालक महेश पडवळ याच्या द्राक्ष बागेत मजुरीचे काम करत होता. प्रमोदचे वडील आजारी असल्याने तो गेल्या चार दिवसांपासून कामावर जाऊ शकला नव्हता. याच कारणावरून चिडलेला शेतमालक महेश पडवळ ११ एप्रिल रोजी रात्री प्रमोदच्या घरी गेला. तिथे त्याने “तू कामावर का येत नाहीस?” असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली आणि त्याला बळजबरीने स्वतःसोबत शेतात घेऊन गेला.

वडील आजारी असल्याचे सांगूनही शेतमालकाने प्रमोदला कामावर नेले आणि तिथेही त्याला मारहाण व अपमानित केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून प्रमोदने १२ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास शेतमालकाच्याच शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

याप्रकरणी मृत प्रमोदचे वडील मनोज नाना अवधुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी महेश पडवळ याच्यावर खालील कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे:

  • भारतीय न्याय संहिता (BNS): कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), ११५(२), ३५२.

  • ॲट्रॉसिटी कायदा: अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ चे कलम ३(१)(r) आणि ३(१)(s).

या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.


Previous Post

तुळजापुरात १५६ कोटींचा रस्ते घोटाळा; महाविकास आघाडीचा गंभीर आरोप, कंत्राटदाराने बनावट कागदपत्रे वापरल्याचा दावा

Next Post

जुने फोटो मॉर्फ करून अफवा पसरवणाऱ्यांची खैर नाही;

Next Post
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

जुने फोटो मॉर्फ करून अफवा पसरवणाऱ्यांची खैर नाही;

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी

September 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा

September 5, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कळंब : बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चिमुरडीच्या गळ्यातील ३० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास; कळंब पोलिसांत गुन्हा दाखल

September 5, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

हंगरगा (नळ) : जागेच्या वादातून वृद्ध महिलेला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; ८ जणांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 5, 2026
शिक्षक दिनीच गुरुजींचे उपोषण! ‘माऊलीं’ची धावपळ अन् ‘लेखी’ आश्वासनाशिवाय माघार नाही!

शिक्षक दिनीच गुरुजींचे उपोषण! ‘माऊलीं’ची धावपळ अन् ‘लेखी’ आश्वासनाशिवाय माघार नाही!

September 5, 2026

Recent Posts

  • धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी
  • उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा
  • कळंब : बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चिमुरडीच्या गळ्यातील ३० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास; कळंब पोलिसांत गुन्हा दाखल
  • हंगरगा (नळ) : जागेच्या वादातून वृद्ध महिलेला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; ८ जणांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • शिक्षक दिनीच गुरुजींचे उपोषण! ‘माऊलीं’ची धावपळ अन् ‘लेखी’ आश्वासनाशिवाय माघार नाही!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!