• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, May 1, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई; विविध ठिकाणी छापे टाकून हजारोंचा प्रतिबंधित गुटखा जप्त

उमरगा, कळंब, आनंदनगर आणि येरमाळा पोलिसांची कारवाई; चौघांवर गुन्हे दाखल

admin by admin
May 1, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
0
SHARES
443
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव :  जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली असून, गुरुवारी (ता. ३०) जिल्ह्यातील उमरगा, कळंब, आनंदनगर आणि येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी छापे टाकण्यात आले. या कारवाईत राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला सुमारे ३४ हजारांचा गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले असून, चार जणांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री सुरू असल्याच्या गुप्त माहितीवरून वेगवेगळ्या पथकांनी गुरुवारी एकाच दिवशी या कारवाया केल्या.

उमरग्यात २२ हजारांचा गुटखा जप्त

उमरगा तालुक्यातील एकुरगावाडी शिवारातील लक्ष्मी पाटी येथील ‘धनलक्ष्मी पान स्टॉल’वर गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणी सुखसेन आण्णाराव आगलावे (वय ५४, रा. एकुरगा) हा विक्रीसाठी प्रतिबंधित गुटखा, ‘डायरेक्टर स्पेशल’ आणि तंबाखूजन्य पदार्थ बाळगताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून २२ हजार ३९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५ सह अन्नसुरक्षा व मानके कायदा कलम ५९ अन्वये उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळंबमध्ये किराणा दुकानाजवळ कारवाई

दुसरी कारवाई कळंब पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. तांदूळवाडी रोडलगत शास्त्री किराणा दुकानाजवळ डिकसळ येथे सायंकाळी पावणेसातच्या सुमारास संजीवन बाबुराव मुर्गे (वय ५०) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ‘विमल’ आणि ‘डायरेक्टर’ पान मसाला असा एकूण २ हजार ७६० रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला असून, त्याच्यावर बीएनएस कलम २२३, २७४, २७५ अन्वये कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

धाराशिव (आनंदनगर) पोलिसांचा बार्शी नाक्यावर छापा

बार्शी नाका रोडवरील डीसीबी बँकेसमोरील ‘रामजी पान स्टॉल’वर धाराशिव (आनंदनगर)पोलिसांनी सायंकाळी सव्वापाच वाजता छापा टाकला. येथे ओंकार भानुदास वाघमारे (वय २८, रा. रामनगर, धाराशिव) याच्याकडून सागर पान मसाला, सुहाना केसर मिश्रित, साउंड पान मसाला, राज निवास आणि एल जाफरानी जर्दा असा एकूण ६ हजार ५७२ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येरमाळा येथे वृद्धावर गुन्हा

येरमाळा ते कळंब जाणाऱ्या रोडवरील रत्नापूर शिवार (टेकाळे वस्ती) येथे रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली. यावेळी गोविंद विठ्ठल टेकाळे (वय ७०, रा. रत्नापूर, ता. कळंब) याच्याकडून २ हजार ७०० रुपये किमतीचा विमल आणि प्रीमियम राज निवास पान मसाला जप्त करण्यात आला. या प्रकरणी येरमाळा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

विक्रेत्यांचे धाबे दणाणले

एकाच दिवशी जिल्ह्याच्या विविध भागात झालेल्या या धडक कारवाईमुळे अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा अवैध व्यावसायिकांवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Previous Post

धाराशिव ब्रेकिंग: महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण स्थळी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न; ७० टक्के भाजल्याने प्रकृती चिंताजनक

Next Post

सुनील बनसोडे यांचे ‘घंटानाद’ आंदोलन मागे; पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर सांगता

Next Post
सुनील बनसोडे यांचे ‘घंटानाद’ आंदोलन मागे; पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर सांगता

सुनील बनसोडे यांचे 'घंटानाद' आंदोलन मागे; पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर सांगता

ताज्या बातम्या

सुनील बनसोडे यांचे ‘घंटानाद’ आंदोलन मागे; पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर सांगता

सुनील बनसोडे यांचे ‘घंटानाद’ आंदोलन मागे; पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर सांगता

May 1, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई; विविध ठिकाणी छापे टाकून हजारोंचा प्रतिबंधित गुटखा जप्त

May 1, 2026
धाराशिव ब्रेकिंग: महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण स्थळी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न; ७० टक्के भाजल्याने प्रकृती चिंताजनक

धाराशिव ब्रेकिंग: महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण स्थळी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न; ७० टक्के भाजल्याने प्रकृती चिंताजनक

May 1, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कळंबमध्ये साडेचार लाखांची घरफोडी, तर धाराशिवमध्ये दुचाकी चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल

April 30, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

खामसवाडीत तरुणांना जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण; आठ जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

April 30, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group