• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, August 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कोल्हेगाव हादरले! कौटुंबिक वादातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीनेही शेतात घेतला गळफास

admin by admin
May 5, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

ढोकी – कौटुंबिक वादातून पतीने आधी स्वतःच्या पत्नीची गळा दाबून निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर स्वतः शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धाराशिव तालुक्यातील कोल्हेगाव येथे घडली आहे. या दुहेरी मृत्यूच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात मयत पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साक्षी श्रीकृष्ण टेकाळे (वय २२) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर श्रीकृष्ण तुकाराम टेकाळे (वय २७, दोघेही रा. कोल्हेगाव, ता. जि. धाराशिव) असे पत्नीची हत्या करून आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकृष्ण आणि साक्षी यांच्यात कौटुंबिक कारणांवरून वाद होते. या वादातूनच  दरम्यान कोल्हेगाव येथे ही भयानक घटना घडली. रागाच्या भरात श्रीकृष्ण याने पत्नी साक्षी हिचा गळा दाबून तिला जीवे मारले. पत्नीची हत्या केल्यानंतर स्वतः श्रीकृष्ण याने आपल्या शेतातील बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

एकाच कुटुंबातील दोघांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कोल्हेगावसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी सतीश शंकर शिंदे (वय ३८, रा. वाखरवाडी, ता. जि. धाराशिव) यांनी सोमवारी (दि. ४ मे २०२६) ढोकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या या प्रथम खबरेवरून मयत आरोपी श्रीकृष्ण टेकाळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ (१) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास ढोकी पोलीस करत आहेत.

Previous Post

धाराशिवमध्ये शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन; ६०० कोटींचा पीक विमा अडकल्याने संताप

Next Post

रस्त्यात मुरुम टाकण्यास मज्जाव केल्याने राडा; चाकूने हल्ला करत तिघांना बेदम मारहाण, ६ जणांवर गुन्हा दाखल

Next Post
येरमाळ्यात कोयत्यासह दोघांना अटक; शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल

रस्त्यात मुरुम टाकण्यास मज्जाव केल्याने राडा; चाकूने हल्ला करत तिघांना बेदम मारहाण, ६ जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

August 24, 2026
तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

August 23, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल

August 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद

August 23, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य

August 23, 2026

Recent Posts

  • तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!
  • तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!
  • उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल
  • परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद
  • तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!