• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, July 11, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

भूममध्ये पोलिसांवर जमावाचा जीवघेणा हल्ला; गाड्यांची तोडफोड

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ५९ जणांसह १५० अज्ञातांवर गुन्हे दाखल

admin by admin
May 17, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड
0
SHARES
1.7k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

भूम :  जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या जमलेल्या जमावाला शांततेचे आवाहन करणाऱ्या पोलिसांवरच जमावाने दगडफेक करत जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना भूम शहरातील भीमनगर भागात घडली. या हल्ल्यात पोलिस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाले असून, संतप्त जमावाने रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करत चारचाकी गाड्या पलटी केल्या. याप्रकरणी भूम पोलिस ठाण्यात ५९ जणांची नावे निष्पन्न झाली असून इतर १५० अनोळखी जणांवर विविध गंभीर कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ मे रोजी रात्री ११ ते १६ मे रोजी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास भीमनगर येथील गोलाई चौकात हा प्रकार घडला. पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद कारभारी करोदे यांनी यासंदर्भात भूम पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गोलाई चौकात रात्रीच्या वेळी १०० ते १५० जणांचा जमाव जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने एकत्र आला होता. याची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक करोदे हे त्यांच्या पोलिस कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जमावाला शांततेचे आवाहन करत कायदा व सुव्यवस्था राखण्याची विनंती केली. मात्र, ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या जमावाने पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला असता, जमावाने जिवे मारण्याच्या उद्देशाने पोलिसांवर जोरदार दगडफेक सुरू केली. या प्राणघातक हल्ल्यात फिर्यादी पोलिस उपनिरीक्षक करोदे यांना जबर मार लागला असून ते गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी जमावाने परिसरात दहशत माजवत रस्त्यावरील चारचाकी गाड्या पलटी करून सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान केले.

यांच्यावर झाला गुन्हा दाखल:

या गंभीर प्रकारानंतर पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवत कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणी अक्की उर्फ अक्षय गायकवाड, संदीप सरवदे, रत्नदिप सरवदे, सचिन शिंदे, शाक्या शिंदे, मुकुंद लगाडे, अनिकेत थोरात, अक्षय युवराज गायकवाड, विकी उर्फ फक्कड जावळे, साजन शिंदे, रितेश गायकवाड, अनिकेत शिंदे, विठ्ठल अण्णा बाराते, दत्ता गाढवे, अवधुत गाढवे, अनिकेत महाडिक, रोहित टिप, अनिकेत टिपे, अमित मस्कर, पिन्नु मस्कर, किरण रेवडकर, मनोज आकरे, निखली काळे, अर्जन जाधव, ज्ञानेश्वर आकरे, गणेश लोंढे, प्रभाकर शेंडगे, सचिन मस्कर, सचिन बनसोडे, दिपक हुरकुडे, दत्ता जाधव, आबासाहेब मस्कर, प्रभाकर गोंगाणे, आकाश शेंडगे, सुयोग पठाण, गणेश शेंडगे, लख्न बाबर, श्रीकांत गायकवाड, बापू मस्कर, दिपक नाईकवाडी, यश वाघवकर, दिनेश मस्कर, सुशांत निकम, सुमित भोळे, शंतणु भोळे, कृष्णा नाईकवाडी, रुशी साबळे, सुरज भोसले, लक्ष्मण यादव, कृष्णा जगदाळे, सुजित जिक्रे, राहुल रिटे, रोहन भोसले, आदेश लिंबकर, प्रथमेश सुपेकर, विजय जिक्रे, आनंद गुरव, अनिकेत गिलबिले, सिध्दु धन सवरदे अशा एकूण ५९ जणांची नावे निष्पन्न झाली आहेत.

या नामनिर्देशित आरोपींसह इतर १५० अनोळखी इसमांवर भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम १०९, ११८(२), १३२, १२१(१), १८९, १९१(१), १९१(२), १९०, १९२, १९५ आणि १९६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे भूम शहरात काही काळ तणावाचे वातावरण होते. सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून, पुढील तपास भूम पोलिस करत आहेत.

Previous Post

गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने पळवणारी टोळी सक्रिय; येरमाळा व कळंबमध्ये ५ महिलांना गंडा

Next Post

जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट; घरफोडीसह बसस्थानकावर चोरी, ६ लाखांहून अधिकचा मुद्देमाल लंपास

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट; घरफोडीसह बसस्थानकावर चोरी, ६ लाखांहून अधिकचा मुद्देमाल लंपास

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

भूम शहरात तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला!

July 11, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंड्यात ‘उपोषणाचा अर्ज’ दिल्याच्या रागातून घरावार जीवघेणा हल्ला!

July 11, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

कळंब तालुक्यात सावकारी त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या! हावरगाव शिवारात लिंबाच्या झाडाला घेतला गळफास; कोल्हे दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल

July 11, 2026
धाराशिव पीक विमा: उच्च न्यायालयाच्या निकालाने शेतकऱ्यांना धक्का, कंपनीला दिलासा

हरवलेल्या विवाहित महिलेला शोधून न्यायालयात हजर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

July 10, 2026
‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’

‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’

July 10, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group