येरमाळा – येरमाळा पोलिसांनी काही पारधी समाजातील तरुणांना हाताशी धरून , शुक्रवारी रात्री गुटख्याने भरलेला एक टेम्पो पकडला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या टेम्पोमध्ये पाच जण असताना, केवळ एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि चार जणांना अभय देण्यात आले आहे. तसेच गुटका तस्कर नकुल पंडित यांचे नाव एफआयआरमधून वगळल्याने उलट – सुलट चर्चा सुरु आहे.
कर्नाटक राज्यातील हुमानाबाद येथून एमएच 12 एचडी 3477 या क्रमांकचा आयशर टेम्पो गोवा गुटखा घेऊन बीडकडे जात असताना, 1)संतोष लाला काळे, 2)प्रशांत उर्फ सचिन बापू पवार, 3) दत्ता दादा काळे, 4) किरण बापू काळे, 5) संतोष राजेंद्र शिंदे सर्व रा. लक्ष्मी पारधी पिडी तेरखेडा ता. वाशी ता. धाराशिव यांनी टेम्पोला मोटारसायकल आडवी लावून चालक अब्दुल मुखीद यांना चाकूचा धाक दाखवून सुगंधी गुटखा गोवाच्या गोण्या काढुन घेतल्या .अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अब्दुल मुखीद यांनी दि.17.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे कलम 395, 323, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तसेच दि.16.2.2024 रोजी 23.00 येरमाळा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी हजारे हे पोलीस स्टाफ सह पोलीस ठाणे येरमाळा हद्दीत पेट्रोलिंग करत असताना कुलकर्णी यांचे पेट्रोलपंपाचे पुढे एनएच 52 रोडवर येरमाळा ब्रिजच्या चौकात येरमाळा ते धाराशिव कडे येणारे वाहन क्र एमएच 12 एचडी 3477 आयशर टॅम्पो हे वाहन दिसून आल्याने नमुद वाहनास पेट्रोलिंग दरम्यान चेक केले असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा मिळून आला. यातील आरोपी नामे-1) अब्दुल बाबुमियॉ मुखीद, वय 38 वर्षे, रा. बाबुमियॉ बेकरी अतनुर गुलबर्गा कर्नाटक याचे ताब्यात नमुद वाहनात गोवा गुटखा एकुण 33 पोते मिळून आला. अंदाजे 26, 88, 000 ₹ किंमतीचा माला सह आयशर वाहन अंदाजे 4,00,000₹ किंमतीचा असा एकुण 30,88,000₹ किंमतीचा माल मिळून आलेने जप्त करुन मिळून आलेले आरोपी नामे-अब्दुल बाबुमियॉ मुखीद, वय 38 वर्षे रा. बाबुमियॉ बेकरी अतनुर गुलबर्गा कर्नाटक याचे विरुध्द पोलीस ठाणे येरमाळार्ग येथे गुरनं 33/2024 भा.द.वि. सं. कलम 328, 272, 273, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टेम्पोमध्ये पाचजण पण एकावर गुन्हा दाखल
गुटख्याने भरलेल्या एमएच 12 एचडी 3477 या क्रमांकच्या आयशर टेम्पो मध्ये एकूण पाचजण होते. त्याचा व्हिडीओ देखील प्रसारित झाला आहे. तरीही येरमाळा पोलिसांनी चालक अब्दुल बाबुमियॉ मुखीद यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि अन्य चार जणांना अभय दिले आहे. तसेच हुमनाबाद येथून गुटखा पाठवणारा गुटखा तस्कर नकुल पंडित याचे नाव एफआयआरमधून वगळले आहे.
पोलीस एक तर गुटख्याची गाडी पकडत नाहीत, पकडले तर फक्त चालकावर गुन्हा दाखल करतात. चार्जशीट कोर्टात लवकर पाठवत नाहीत, पाठवले त्यात शिक्षा होता नाहीत, त्यामुळे महाराष्ट्रात गुटखा तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
येरमाळा येथून धाराशिव पोलीस मुख्यालयात बदली झालेला पोलीस KB ने त्या पारधी तरुणांना टेम्पोबद्दल confidential information दिल्याची चर्चा आहे.. टेम्पोला gps tracker बसवण्यात आले होते, अशीही माहिती आहे.
येरमाळा पोलिसांचे गुटखा तस्कराशी अर्थपूर्ण संबंध उघड
येरमाळा पोलिसांनी काही पारशी समाजातील तरुणांना हाताशी धरून, शुक्रवारी रात्री तेरखेडाजवळ गुटख्याने भरलेला एक टेम्पो पकडला, नंतर गुटखा तस्करी करणाऱ्या लोकांबरोबर ‘अर्थपूर्ण’ बोलणी करून टेम्पो सोडून देण्याच्या बेतात असताना, पारधी तरुणांनी व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू केली, तेव्हा पोलिसांनी नाईलाजाने गुटखा प्रकरणी गुन्हा दाखल केला तसेच टेम्पो आडवणाऱ्या तरुणावर देखील गुन्हा दाखल केला आहे.
आम्ही चोऱ्या माऱ्या सोडून आता चांगले काम करून जीवन जगत असताना, पोलीस आमचा वापर करीत आहेत तसेच गुटखा प्रकरणी हप्ता घेऊन गुटखाच्या गाड्या सोडत आहेत, असा आरोप या तरुणांनी केला आहे.