कळंब : फिर्यादी नामे-रामराजे लिंबराज ढेपे, वय 34 वर्षे, रा. लाखनगाव ता. वाशी जि. धाराशिव हे व सोबत बालाजी दिगंबर थोरात, वय 34 वर्षे रा. मस्सा खं हे दि. 16.02.2024 रोजी 00.09 वा. सु. समर्थ पेट्रोल पंपाचे केबीनमध्ये बसलेले असताना अनोळखी चार इसमांनी तेथे येवून कोयत्याचा धाक दाखवून व उलट्या कोयत्याने मारुन शिवीगाळ करुन धमकी देवून कॉउंन्टर मधील रोख रक्कम 70,000 ₹ व दोन मोबाईल असा एकुण 72,000 ₹ किंमतीचा माल कोयत्याचा धाक दाखवून जबरीने लुटून पसार झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रामराजे ढेपे यांनी दि.16.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 394, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण : फिर्यादी नामे-धंनजय ज्ञानोबा पालकर, वय 52 वर्षे, रा. सौदना आंबा ता. कळंब जि. धाराशिव यांची अंदाजे 40,000₹ किंमतीची होंडा एच एफ डिलक्स कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल क्र एमएच 44 एन 9708 ही दि. 15.02.2024 रोजी 05.30 ते 06.45 वा. सु. धंनजय पालकर यांचे राहाते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- धंनजय पालकर यांनी दि.16.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : फिर्यादी नामे- प्रेम प्रकाश सहीराम, वय 32 वर्षे,रा. भिमनगर ओसीया जातेपुर राज्य राजस्थान ह.मु. सांगवी मार्डी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे दि. 16.02.2024 रोजी 01.37 ते 01.45 वा. सु. तुळजापूर येथे व समाधान वैजीनाथ बागल यांचे घरी 00.00 ते 07.30 वा. सु. आरोपी नामे- नरेंद्र बाबुलाल निमली रा. बाडमेर राज्य राजस्थान पॅन्टच्या खिशातील 70,000₹ पॉकीटमधील ए.टी.एम चोरुन घेवून इंन्डुस्लॅन्ड बॅक ए.टी. एम. तुळजापूर येथुन 90,000 ₹ कढून असा एकुण 1,60,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रेम सहीराम यांनी दि.16.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
परंडा :आरोपी नामे-1)विजय माधव नवले, 2) संगीता विजय नवले 3) आकाश विजय नवले सर्व रा. सिरसाव ता. परंडा जि. धाराशिव हे दि. 13.02.2024 रोजी 18.00 वा. सु. सिरसाव येथे फिर्यादी नामे- सोमनाथ सोपान मुके, वय 50 वर्षे, रा. सिरसाव ता. परंडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतरस्त्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड, लोखंडी पाईप रॉड काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीची पत्नी अर्चना यांना नमुद आरोपींनी घरा मध्ये घुसून लोखंडी रॉडने डोक्यात मारुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सोमनाथ मुके यांनी दि.16.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 324, 452, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.