• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानंतर दोन नर्सेसना विषबाधा

वारीतील वाटपापूर्वीच प्रकार उघड, मोठा अनर्थ टळला

admin by admin
July 12, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानंतर दोन नर्सेसना विषबाधा
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब : धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात शीतपेय प्यायल्यानंतर दोन नर्सेसना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पूजा जाधव आणि पल्लवी सौदागर अशी विषबाधा झालेल्या नर्सेसची नावे आहेत. या घटनेमुळे कळंब शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शीतपेय प्यायल्यानंतर पूजा जाधव आणि पल्लवी सौदागर यांना विषबाधेची लक्षणे जाणवली. पूजा जाधव यांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले आहे. सध्या लातूर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर पल्लवी सौदागर यांच्यावर अंबाजोगाई येथे उपचार सुरू आहेत.

संत गजानन महाराजांच्या वारीत वाटले जाणार होते शीतपेय

धक्कादायक बाब म्हणजे संबंधित शीतपेय शेगावच्या संत गजानन महाराजांच्या वारीत भाविकांना वाटले जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, शीतपेयाचे वाटप होण्यापूर्वीच दोन नर्सेसना विषबाधा झाल्याची घटना घडली.

या प्रकाराची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) पथक घटनास्थळी दाखल झाले. अन्न व औषध प्रशासन, पोलीस तसेच सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवाई करत वारीत वाटपासाठी ठेवण्यात आलेल्या शीतपेयाच्या बाटल्या जप्त केल्या. वेळीच हा प्रकार उघडकीस आल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळला.

शीतपेय कुठून आले? कोण करणार होते वाटप?

संबंधित शीतपेय नेमके कुठून आणण्यात आले होते? संत गजानन महाराजांच्या वारीत त्याचे वाटप कोण करणार होते? शीतपेयामध्ये काही दूषित घटक होते का? तसेच दोन नर्सेसना झालेल्या विषबाधेचे नेमके कारण काय? याचा तपास सुरू आहे.

अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून, जप्त करण्यात आलेल्या शीतपेयाच्या बाटल्यांची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे.

या घटनेमुळे कळंब शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या तपासातून नेमके काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

मल्हार पाटील-दत्ताभाऊ कुलकर्णी भेटीवर राजकीय चर्चा; सोमनाथ गुरव यांची ‘गाठीभेटी’ पोस्ट चर्चेत

Next Post

वारी करायची नसते… अनुभवायची असते!

Next Post
वारी करायची नसते… अनुभवायची असते!

वारी करायची नसते... अनुभवायची असते!

ताज्या बातम्या

तुळजाभवानी मंदिर प्रकरण: भाजप नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना जिल्हाधिकाऱ्यांची ‘कारणे दाखवा’ नोटीस

तुळजाभवानी मंदिर प्रकरण: भाजप नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना जिल्हाधिकाऱ्यांची ‘कारणे दाखवा’ नोटीस

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजाभवानी मंदिर परिसरात चोरीच्या दोन घटना; दोन महिला ताब्यात

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात दोन विवाहित पुरुषांचे अपहरण; लोहारा आणि परंडा पोलिसांत गुन्हे दाखल

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

वाशी : टेम्पोतील कोऱ्या चेकवर खोटी सही करून लावला ८ लाखांचा चुना

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

अणदूर : बेकायदेशीर ताडीत (शिंदी) गुंगीचे औषध मिसळल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

October 16, 2026

Recent Posts

  • तुळजाभवानी मंदिर प्रकरण: भाजप नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना जिल्हाधिकाऱ्यांची ‘कारणे दाखवा’ नोटीस
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात चोरीच्या दोन घटना; दोन महिला ताब्यात
  • धाराशिव जिल्ह्यात दोन विवाहित पुरुषांचे अपहरण; लोहारा आणि परंडा पोलिसांत गुन्हे दाखल
  • वाशी : टेम्पोतील कोऱ्या चेकवर खोटी सही करून लावला ८ लाखांचा चुना
  • अणदूर : बेकायदेशीर ताडीत (शिंदी) गुंगीचे औषध मिसळल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!