• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

35 वर्षे पक्षात काम करणाऱ्या भाजप नेत्याला मंत्र्यांची भेट नाकारली?

संतप्त अनिल काळे यांनी जयकुमार गोरेंचाच रस्ता अडवून विचारला जाब

admin by admin
July 27, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
35 वर्षे पक्षात काम करणाऱ्या भाजप नेत्याला मंत्र्यांची भेट नाकारली?
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव |  भाजपचे धाराशिव जिल्ह्याचे संपर्कमंत्री जयकुमार गोरे यांच्या दौऱ्यात पक्षातील अंतर्गत गटबाजी उघडपणे समोर आली. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल काळे यांना मंत्र्यांची भेट घेण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार घडल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी अनिल काळे यांना मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊ दिली नाही, असा आरोप करण्यात आला. यामुळे संतप्त झालेल्या अनिल काळे यांनी थेट मंत्र्यांचा रस्ता अडवत जाब विचारला.

“मी 35 वर्षे पक्षासाठी एकनिष्ठपणे काम करतोय. मंत्री म्हणून तुम्हाला भेटायचं नाही का? आम्हालाच का अडवलं जात आहे?” असा थेट सवाल अनिल काळे यांनी जयकुमार गोरे यांच्यासमोर उपस्थित केला.

या अनपेक्षित घडामोडीमुळे काही काळ मंत्री जयकुमार गोरे निरुत्तर झाल्याचे उपस्थितांनी सांगितले. घटनेनंतर परिस्थिती हाताळण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी हस्तक्षेप करत अनिल काळे यांची समजूत काढली आणि झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती आहे.

यावेळी अनिल काळे यांनी आणखी गंभीर आरोप करत, “स्वतः भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीच मला मंत्र्यांच्या भेटीपासून रोखले,” असा दावा केला. गेली 35 वर्षे पक्षासाठी एकनिष्ठपणे काम करत असूनही मंत्र्यांची भेट घेऊ दिली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या आरोपामुळे उपस्थितांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

या प्रकरणावर आपण गप्प बसणार नसल्याचे स्पष्ट करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आमदार राणा पाटील यांच्या विरोधात लिखित तक्रार करणार असल्याचे अनिल काळे यांनी सांगितले.

संपर्कमंत्र्यांच्या दौऱ्यातच घडलेल्या या प्रकारामुळे धाराशिव भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि नाराजी पुन्हा एकदा उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Video

Previous Post

धाराशिव जिल्हा परिषदेला ग्रामविकास मंत्र्यांची केराची टोपली

Next Post

होर्डिंगवरून महायुतीत ठिणगी; तानाजीराव सावंत-ओमराजे यांचे फोटो वगळल्याने कार्यक्रमावर बहिष्कार

Next Post
होर्डिंगवरून महायुतीत ठिणगी; तानाजीराव सावंत-ओमराजे यांचे फोटो वगळल्याने कार्यक्रमावर बहिष्कार

होर्डिंगवरून महायुतीत ठिणगी; तानाजीराव सावंत-ओमराजे यांचे फोटो वगळल्याने कार्यक्रमावर बहिष्कार

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

September 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली

September 16, 2026

Recent Posts

  • दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास
  • जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल
  • धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद
  • तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!