• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 15, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

 कमळाबाईच्या दरबारातला मॉडर्न भस्मासुर आणि निष्ठावंतांची गोची!

admin by admin
July 29, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
 कमळाबाईच्या दरबारातला मॉडर्न भस्मासुर आणि निष्ठावंतांची गोची!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

प्रवेश पहिला: सत्तेची जादू आणि निष्ठावंतांचे अश्रू

राजकारणाच्या रंगमंचावर एक भस्मासुर होता. या भस्मासुराविरुद्ध ‘कमळाबाईच्या’ निष्ठावंत ‘हाफ चड्डी’ वाल्यांनी तब्बल ४० वर्षे असा काही घाम गाळला की जणू तो स्वातंत्र्यलढाच! पण राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भस्मासुराचा दारुण पराभव झाला आणि सत्तेविना तडफडणाऱ्या या भस्मासुराने थेट ‘कमळाबाईच्या’ गोटातच उडी मारली.

कालपर्यंत ज्याच्या नावाने बोटे मोडली, त्यालाच आता गळ्यात गळे घालून “जय” म्हणण्याची पाळी निष्ठावंतांवर आली. बिचाऱ्या कार्यकर्त्यांनी रडत-खडत घोट गिळला, जुने वैर विसरून त्याचा प्रचार केला आणि त्याला विधानसभा जिंकून दिली. भस्मासुर पुन्हा फॉर्ममध्ये आला!

प्रवेश दुसरा: बकुळाबाई, लाडकी बहीण आणि ‘मी पणा’

बघता-बघता २०२४ ची लोकसभा निवडणूक आली. भस्मासुराने अति-उत्साहात आपल्या सौभाग्यवती ‘बकुळाबाईंना’ रिंगणात उतरवले. पण जनतेने त्यांना “येतो आम्ही” म्हणत घरी बसवले. त्यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र ‘लाडक्या बहिणीच्या’ पुण्याईने भस्मासुर कसातरी वाचला.

पण भस्मासुराला वाटले की हा सारा चमत्कार आपलाच आहे! नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आल्या. कमळाबाईच्या निष्ठावंतांनी पायाला भिंगरी लावून अहोरात्र मेहनत केली आणि घवघवीत यश मिळवून दिले. पण विजयाचा गुलाल उधळताना भस्मासुराने कॉलर टाईट केली आणि जाहीर केले, “हे सगळं फक्त माझ्यामुळेच झालं!” बक्षीस म्हणून त्याने स्वतःच्याच बकुळाबाईंना थेट अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवून टाकले.

प्रवेश तिसरा: बकासुर आणि नागपूरचे पोलार्ड

आता मात्र भस्मासुराच्या डोक्यात सत्तेची आणि पैशाची हवा गेली होती. तो ३५-३५ वर्षे सतरंज्या उचलणाऱ्या जुन्या निष्ठावंतांना चक्क ‘तुच्छ’ समजू लागला. साहेबांचा रुबाब एवढा वाढला की, एखादा साधा-सुधा मंत्री आला, तर भस्मासुर स्वतः एसी केबिनमधून बाहेर न येता आपल्या ‘बकासुराला’ (पीए/चमचा) पुढे करू लागला. साहेबांचा नियम एकच – “नागपूरचे ‘पोलार्ड’ किंवा ‘भाऊ’ आले, तरच आपण स्वतः हजर राहायचं, बाकी चिल्लर पार्टीला बकासुर बघून घेईल!”

प्रवेश चौथा (क्लायमॅक्स): सातारकरांचा दौरा आणि भस्मासुराची घमेंड

परवा गावात संपर्कमंत्री ‘सातारकर’ आले होते. भस्मासुराने स्वतःची आणि बायकोची पाठ थापटून घेण्यासाठी एक भव्य ‘इव्हेंट’ आयोजित केला. त्यात मित्र पक्षासोबत राडा तर झालाच, पण भस्मासुराने तिथे कळस गाठला. ३५ वर्षे कमळाबाईची सेवा करणाऱ्या एका कट्टर निष्ठावंताचा त्याने भर सभेत घोर अपमान केला आणि त्याला सातारकरांना भेटूच दिले नाही.

हा अपमान जिव्हारी लागल्याने आता सगळ्या ‘हाफ चड्डी’ वाल्यांच्या रागाचा स्फोट झाला आहे. “ज्या भस्मासुराला आपणच सत्तेचं वरदान देऊन मोठं केलं, तो आता आपल्याच डोक्यावर हात ठेवून आपलाच गेम करायला निघालाय,” हे विदारक सत्य त्यांना अखेर उमगले आहे.

सध्या शहरात एकच चर्चा आहे… सर्व हाफ चड्डी वाले आता गुप्तपणे एकत्र आले असून, या ‘मॉडर्न भस्मासुराचा’ करेक्ट कार्यक्रम (नायनाट) कसा करायचा, याची खतरनाक रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे! पिक्चर अभी बाकी है…

– बोरूबहाद्दर

Previous Post

धाराशिव शहरात गुटखा माफियावर पोलिसांची सर्जिकल स्ट्राईक! शम्स चौकात १७.८२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा

Next Post

उमरगा उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना ५ लाखांची खंडणी मागत धिंगाणा!

Next Post
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना ५ लाखांची खंडणी मागत धिंगाणा!

ताज्या बातम्या

धाराशिवमधील रस्त्यांसाठी १४० कोटींची फेरनिविदा; दिवाळीनंतर कामांना सुरुवात, पण निवडणुकीच्या आचारसंहितेचं काय?

पालकमंत्री की केवळ ‘झेंडा मंत्री’?

September 15, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी

September 14, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

September 13, 2026

Recent Posts

  • पालकमंत्री की केवळ ‘झेंडा मंत्री’?
  • तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार
  • शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल
  • माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी
  • आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!