• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, November 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरगा उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना ५ लाखांची खंडणी मागत धिंगाणा!

डॉ. कोमल गरड यांना धमकी देऊन विनयभंग; दोघांवर उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल

admin by admin
July 29, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा: उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. कोमल हरीदास गरड (जाधव) यांना “माहिती दिली नाही तर नोकरी घालवतो” अशी धमकी देत ५ लाख रुपयांची खंडणी मागण्याचा आणि हातापाई करून विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शासकीय कामात अडथळा आणून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी अरेरावी करणाऱ्या दोन जणांविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासकीय कार्यालयात घुसून ५ लाखांची खंडणी मागितली

पोलिसांकडून व प्राप्त फिर्यादीवरून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, डॉ. कोमल गरड (वय ४५ वर्षे, रा. आरोग्य नगर, उमरगा) या गेल्या दोन वर्षांपासून उपजिल्हा रुग्णालय, उमरगा येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

२० जुलै २०२६ रोजी दुपारी ३:३० ते ४:०० वाजण्याच्या सुमारास डॉ. गरड या आपल्या कक्षातून बाहेर जात असताना, प्रफुल्ल श्रावण गायकवाड (रा. औराद) आणि ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव (रा. तुरोरी) हे दोघे त्यांच्या जवळ आले. प्रफुल्ल गायकवाड याने रुग्णालयाच्या जनरेटरच्या डिझेलची माहिती मागितली. यावर डॉ. गरड यांनी “रीतसर अर्ज द्या, मग माहिती दिली जाईल” असे सांगितले.

त्याचा राग धरून प्रफुल्ल याने, “उपसंचालक आरोग्य विभाग रेखा गायकवाड मॅडम माझ्या नातेवाईक आहेत. तुमच्याविरोधात चौकशी लावून तुम्हाला बडतर्फ करतो, नोकरी घालवतो, तुमची धिंड काढतो. हे टाळायचे असेल तर मला ५ लाख रुपये द्यावे लागतील” अशी थेट धमकी दिली. तर ज्ञानेश्वर जाधव यानेही ५ लाख रुपयांची मागणी लावून धरली.

हात ओढून विनयभंग अन् कामात अडथळा

पैसे देण्यास नकार दिला असता आरोपींनी डॉ. गरड यांच्यासोबत हातापाई करत त्यांचा डावा हात ओढला. यामुळे त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न झाली. त्यानंतर आरोपींनी रुग्णालयातील कर्मचारी जनाबाई कुंभार आणि फुलसुंदर यांच्या कक्षात जाऊन डिझेलचे रजिस्टर बळजबरीने कपाटातून काढून त्याचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला व शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

वरिष्ठांशी चर्चा करून उमरगा पोलिसांत तक्रार

शासकीय कार्यालयात घडलेल्या या गंभीर प्रकारानंतर डॉ. कोमल गरड यांनी वरिष्ठांशी चर्चा करून उमरगा पोलीस ठाणे गाठून दोन्ही आरोपींविरुद्ध फिर्याद दिली आहे.

त्यांच्या तक्रारीवरून उमरगा पोलिसांनी आरोपी प्रफुल्ल श्रावण गायकवाड आणि ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव यांच्याविरुद्ध खंडणी, शासकीय कामात अडथळा आणणे, विनयभंग आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून पोलीस पुढील सखोल तपास करत आहेत.

Previous Post

 कमळाबाईच्या दरबारातला मॉडर्न भस्मासुर आणि निष्ठावंतांची गोची!

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरुच; ६ लाखांहून अधिक मुद्देमालाची लांबवालांबव, ५ पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरुच; ६ लाखांहून अधिक मुद्देमालाची लांबवालांबव, ५ पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

धाराशिवमध्ये तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा

November 3, 2026
चारित्र्याच्या संशयातून महिलेचा खून; फरार आरोपी कळंब पोलिसांच्या ताब्यात

चारित्र्याच्या संशयातून महिलेचा खून; फरार आरोपी कळंब पोलिसांच्या ताब्यात

November 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूरमध्ये १३ वर्षीय मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

November 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; दोन म्हशींसह सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल लंपास

November 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

कौटुंबिक वादातून पत्नी व सासऱ्यावर चाकूने हल्ला; परंड्यात पतीविरुद्ध गुन्हा

November 2, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा
  • चारित्र्याच्या संशयातून महिलेचा खून; फरार आरोपी कळंब पोलिसांच्या ताब्यात
  • तुळजापूरमध्ये १३ वर्षीय मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; दोन म्हशींसह सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल लंपास
  • कौटुंबिक वादातून पत्नी व सासऱ्यावर चाकूने हल्ला; परंड्यात पतीविरुद्ध गुन्हा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!