• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘ऑपरेशन लोटस’ फेल अन् ओमराजेंचे ‘ऑपरेशन टायगर’ सक्सेस! मल्हार पर्वाची हवा गुल, आता ‘आपला तो बाळ्या…’

धाराशिव 'कुरुक्षेत्र' नवा अंक: 17

admin by admin
August 27, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
ठाकरे गटाला धक्का; धाराशिवच्या चार नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

पुण्याच्या हॉटेलमधून पळवून आणलेले ते ५ नगरसेवक नक्की कुठे जाणार, या सर्वात मोठ्या सस्पेन्सवरून अखेर पडदा उठला आहे! साहेबांचे (राणा पाटील) आणि भावी खासदारांचे (मल्हार पाटील) ‘ऑपरेशन लोटस’ सपशेल फेल झाले असून, खासदार ओमराजे निंबाळकर यांचे ‘ऑपरेशन टायगर’ मात्र १००% फत्ते झाले आहे! कालपर्यंत भाजपच्या वाटेवर असणारे ४ नगरसेवक आज अधिकृतपणे ‘धनुष्यबाण’ हाती घेऊन शिंदे गटात सामील झाले आहेत.

यात एक भन्नाट ट्विस्ट असा की, ठरलेल्या ५ पैकी पाचवा मोहरा ऐन प्रवेशाच्या वेळी अचानक ‘गायब’ झाला आहे! पण तोही लवकरच ‘शिंदे’ सेनेतच प्रकट होईल, असा पक्का कयास बांधला जात आहे.

मल्हार पर्वाची ‘ट्रोल आर्मी’ उघडी पडली: आपला तो बाळ्या, दुसऱ्याचे कार्टे!

या सगळ्यात सर्वात मोठी कॉमेडी आणि ‘यु-टर्न’ पाहायला मिळतोय तो मल्हार पाटलांच्या सोशल मीडियावरील ‘ट्रोल आर्मी’चा!

कालपर्यंत हेच बगलबच्चे आणि चमचे सोशल मीडियावर छाती बडवून ‘मल्हार पर्व’च्या नावाने पोस्ट टाकत होते. “पाहा, मल्हार दादांची ताकद! खासदार ओमराजेंच्या नाकावर टिच्चून पाच नगरसेवक फोडले!” अशा वल्गना केल्या जात होत्या. पण जेव्हा हॉटेलमधला राडा झाला आणि हेच नगरसेवक ओमराजेंच्या गळाला लागले, तेव्हा या ‘ट्रोल आर्मी’ची भाषा रातोरात बदलली!

आता हेच चमचे सोशल मीडियावर रडगाणे गात आहेत की, “खासदार ओमराजे यांच्या मामाने प्रत्येकी इतकी-इतकी भलीमोठी रक्कम देऊन हे नगरसेवक फोडले हो!” म्हणजे साहेब आणि मल्हार पाटलांनी नगरसेवक पळवले तर ती ‘चाणक्यनीती’ आणि ‘मल्हार पर्वाची ताकद’, पण तेच नगरसेवक ओमराजेंनी घेतले तर तो ‘घोडेबाजार’? यालाच म्हणतात- “आपला तो बाळ्या, आणि दुसऱ्याचं ते कार्टं!” या दुटप्पी भूमिकेमुळे आता शहरात साहेबांच्या गोटाची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे.

अधिकृत बातमी: ठाकरे गटाला भगदाड, ४ नगरसेवक शिंदे सेनेत!

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या अधिकृत पोस्टद्वारे या ‘सर्जिकल स्ट्राईक’ची घोषणा केली. धाराशिव नगरपालिकेचे नगरसेवक प्रदीप मुंडे, संतोष ऊर्फ नाना घाडगे, सोनाली अमित उंबरे आणि केसरबाई ज्ञानदेव करवर (तसेच अमित उंबरे आणि ज्ञानदेव करवर) यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

या पक्षप्रवेशामुळे धाराशिव शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सर्वात मोठा राजकीय धक्का बसला आहे. एकाच वेळी नगरपालिकेतील ४ लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी एकत्रितपणे पक्ष सोडल्याने ठाकरे गटाचे शहरातील गणित कोलमडले आहे.

दुसरीकडे, या नव्या सहकाऱ्यांच्या प्रवेशामुळे धाराशिव शहरात शिवसेना शिंदे गटाची संघटना अधिक मजबूत झाली असून, ओमराजेंनी साहेबांच्या तोंडचा घास हिरावून घेत ‘टायगर’ची खरी डरकाळी फोडली आहे.

थोडक्यात सांगायचे तर, ‘ऑपरेशन लोटस’च्या नादात साहेबांच्या हाती फक्त ‘धपाटे’ आले, आणि ओमराजेंनी आयत्या बिळावर नागोबा करत बाजी मारली! आता ५ वा गायब झालेला नगरसेवक कधी प्रकट होणार आणि साहेब या अपमानाचा बदला कसा घेणार? याकडे संपूर्ण धाराशिवकरांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

ठाकरे गटाला धक्का; धाराशिवच्या चार नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

Next Post

धाराशिवमध्ये राजकारण तापले! पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर ‘१ कोटीचा गद्दार’चे बॅनर्स

Next Post
धाराशिवमध्ये राजकारण तापले!  पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर ‘१ कोटीचा गद्दार’चे बॅनर्स

धाराशिवमध्ये राजकारण तापले! पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर '१ कोटीचा गद्दार'चे बॅनर्स

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी

October 17, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून

October 17, 2026

Recent Posts

  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
  • उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला
  • खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला
  • जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी
  • भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!