धाराशिव – शहरातील शेकापूर रोडवरील बालाजीनगरमध्ये एका घरात वेश्या व्यवसाय सुरु होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या कुंटणखान्यावर छापा मारून, तीन महिलांची सुटका केली तर वेश्या व्यवसाय करणाऱ्या दलाल महिलेस अटक केली आहे.
धारशिव शहरातील बालाजीनगर येथे एक महिला काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवुन घेत आहेत. यावर पोलीस पथकाने नमुद ठिकाणी छापा टाकला असता बालाजीनगर मधील उत्तर मुखी घरामध्ये तीन महिला (नाव- गाव गोपनीय) आढळुन आल्याने महिला पोलीसांमार्फत त्यांची विचारपुस केली असता आरोपी नामे- भाग्यश्री नारायण इंगळे, वय 40 वर्षे, रा. बालाजीनगर शेकापुर रोड धाराशिव या महिलेस वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन त्यास लैंगीक स्वैराचाराकरीता परावृत्त करत होती व नमुद आरोपी ही त्यावर स्वत:ची उपजिवीका करत आहेत असे समजले.
यावरुन पथकाने आरोपी नामे- भाग्यश्री नारायण इंगळे, वय 40 वर्षे, रा. बालाजीनगर शेकापुर रोड धाराशिव यांना ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातील एक मोबाईल फोन, निरोधची पाकीटे व रोख रक्कम असा एकुण 17,508 ₹ माल हस्तगत केला. पोलीसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या आरोपीच्या ताब्यातुन त्या महिलांची सुटका करुन आरोपी नामे- भाग्यश्री नारायण इंगळे, वय 40 वर्षे, रा. बालाजीनगर शेकापुर रोड धाराशिव यांचेविरुध्द गुरनं 105/2024 भा.दं.वि. सं. कलम- 370, सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम- 3, 4, 5, 7 अन्वये धारशिव शहर पोलीस ठाण्यात दि. 11.03.2024 रोजी गुन्हा नोंदवला आहे.