• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, October 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!

admin by admin
October 18, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: राजकारणात कायमचा कोणी मित्र नसतो आणि पक्का शत्रूही नसतो, हा राजकीय नियम धाराशिवच्या मातीत पुन्हा एकदा शंभर टक्के खरा ठरला आहे. वर्षभरापूर्वी ज्या नेत्याला चौकात डॉल्बीवर गाणं लावून डिवचलं, ज्याच्यासमोर हातवारे करीत शड्डू ठोकले, आज त्याच नेत्याच्या पायावर निष्ठा वाहत भाजपच्या एका कट्टर शिलेदाराने थेट ‘धनुष्यबाण’हाती घेतली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासमोर गाण्यावर नाचून खिल्ली उडवणारे नितीन शेरखाने आता भाजपची साथ सोडून ओमराजेंच्या नेतृत्वात शिवसेनेत (एकनाथ शिंदे ) दाखल झाले आहेत.

‘त्या’ डान्सचा हिशोब अन् राजकारणाचा यू-टर्न

सन २०२५ च्या गणेशोत्सवातील काळ्या मारुती चौकातला तो हायव्होल्टेज प्रसंग धाराशिवकर अजून विसरलेले नाहीत. एका बाजूला भाजप तर दुसऱ्या बाजूला शिवसेना… खासदार ओमराजे निंबाळकर स्टेजवर असतानाच भाजपच्या स्टेजवरून गाणं वाजलं— ‘रडू नको बाळा, तुला ढोलकीला बांधून बदाबदा बडवीन!’ आणि याच गाण्यावर बेभान होऊन खासदारांना डिवचणारा चेहरा होता नितीन शेरखाने. मात्र, काळाचा महिमा बघा, वर्ष फिरलं आणि त्याच शेरखान्यांनी भाजपलाच ‘बदाबदा’ झटका देत थेट ओमराजेंच्या दरबारात हजेरी लावली.

भाजप सोडण्यामागची ‘इनसाइड स्टोरी’

शेरखान्यांचा हा राजकीय भूकंप उगाच घडलेला नाही; त्यामागे निष्ठावंतांची होणारी गळचेपी आणि भाजपमधील अंतर्गत डावपेच कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे:

  • सांजामधून तिकिटाचा गेम: जिल्हा परिषद निवडणुकीत सांजा मतदारसंघातून शेरखाने यांनी उमेदवारी मागितली होती. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शेवटपर्यंत त्यांना झुलवत ठेवले आणि ऐन मोक्याच्या क्षणी तानाजी शिंदे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकून शेरखान्यांचा पत्ता कट केला.

  • सीएनजी पंपाची ‘एनओसी’ अडकवली: तुळजापूर रोडवरील सीएनजी पंपाच्या मंजुरीसाठी शेरखान्यांनी प्रस्ताव दिला होता. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या एनओसीसाठी भाजप आमदारांनी त्यांना उंबरठे झिजवायला लावले. विशेष म्हणजे, ज्यांच्या विरोधात शेरखाने रस्त्यावर नाचले, त्याच खासदार ओमराजे निंबाळकरांनी कोणतीही कटुता मनात न ठेवता अवघ्या एका दिवसात शेरखान्यांचे काम मार्गी लावले.

“माझी चूक झाली, ते लबाड निघाले!”

शिवसेनेच्या पक्षप्रवेशानंतर नितीन शेरखाने यांनी भाजपच्या पाटील घराण्यावर जोरदार तोफ डागली. “आमदार राणा पाटील, मल्हार पाटील आणि अर्चना पाटील हे लबाड आणि विश्वासघातकी आहेत. ओमराजेंसारख्या माणसाला सोडून भाजपमध्ये गेलो, ही माझी सर्वात मोठी चूक होती,” अशी जाहीर कबुली देत शेरखान्यांनी आपल्या मनातील खदखद बाहेर काढली.

कालपर्यंत चौकात डिवचणारा कार्यकर्ता आज स्वतःच्या गोटात खेचून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजपला त्यांच्याच बालेकिल्ल्यात उघडे पाडत राजकीय पटलावर एक जबरा ‘गेम’ उलटवला आहे.

Previous Post

हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा

Next Post

धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष

ताज्या बातम्या

धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष

धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष

October 18, 2026
‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!

‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!

October 18, 2026
हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा

हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा

October 18, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला

October 17, 2026

Recent Posts

  • धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष
  • ‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!
  • हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा
  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
  • उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!