नळदुर्ग : अणदूर बसस्थानकासमोर ॲपे रिक्षातून गोवंशीय मांसाची बेकायदेशीररीत्या वाहतूक करून विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांविरुद्ध नळदुर्ग पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत 15 किलो गोवंशीय मांस आणि वाहतुकीसाठी वापरलेले ॲपे वाहन असा एकूण 52 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
पोलिसांच्या माहितीनुसार, महंमद युनुस इस्माईल कुरेशी (वय 56, रा. नानीमॉ रोड, नळदुर्ग), ईलाही मुसा कुरेशी (वय 34, रा. कुरेशी गल्ली, नळदुर्ग) आणि शिरीष शिवाजीराव डुकरे (वय 38, रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर) हे 30 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास अणदूर बसस्थानकासमोर ॲपे क्रमांक एमएच 25 एन 310 मधून गोवंशीय मांसाची वाहतूक करताना आढळून आले.
या ॲपेमध्ये 15 किलो गोवंशीय मांसाची किंमत 21 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. वाहनासह एकूण मुद्देमालाची किंमत 52 हजार 100 रुपये आहे.
याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी सरकारतर्फे संबंधित तिघांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातील कलम 5(अ), 5(क) आणि 9(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास नळदुर्ग पोलीस करीत आहेत.



