उमरगा : फिर्यादी नामे- सतिश काशीनाथ पाटील, वय 52 वर्षे, सोबत त्यांचे पत्नी मयत नामे- संगीता उर्फ मंगल सतिश पाटील रा. बोरगाव (तुपाची) ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दोघे दि.16.03.2024 रोजी 08.45 वा. सु. लुना मोटारसायकल क्र एमएच 25 एव्ही 7053 वरुन मुळज येथे जात असताना येळी गावाचे पुढे एक किमी अंतरावर एनएच 65 रोडवर मोटरसायकल क्र केएस 32 ईआर 5032 चा चालकाने त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजीपणे चालवून सतिश पाटील यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात संगीता पाटील या गंभीर जखमी होवून मयत झाल्या. नमुद मोटरसायकल चालक हा अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सतिश पाटील यांनी दि.22.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 337, 338, 304(अ) सह 184, 134 (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी : मयत नामे- शितल उर्फ मुन्ना अदिनाथ जाधव, वय 48 वर्षे, रा. मारवाड गल्ली ढोकी ता. जि. धाराशिव हे दि.21.03.2024 रोजी 16.15 वा. सु. मोटारसायकल क्र एमएच 25 झेड 4184 वरुन बसून पेट्रोलपंपातुन बाहेर ढोकीकडे जाण्याकरीता थांबला असता नृसिंह पेट्रोलपंप ढोकी समोर बस क्र एमएच 20 बीएल 2631 चा चालक नामे- महादेव जोतीराम नरवडे धाराशिव डोपो यांनी त्याचे ताब्यातील बस ही हायगई व निष्काळजीपणे चालवून शितल उर्फ मुन्ना जाधव यांचे मोटरसायकलला रॉगसाईडने धडक दिली. या अपघातात शितल उर्फ मुन्ना जाधव हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- संजु अदिनाथ जाधव, वय 46 वर्षे, रा. मारवाड गल्ली ढोकी ता. जि. धाराशिव यांनी दि.22.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 304(अ) सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.