नळदुर्ग : फिर्यादी नामे- मधुकर नामदेव कवडे, वय 55 वर्षे, रा. बोरामणी ता. द. सोलापूर जि. सोलापूर यांनी आरोपी नामे- 1) एकनाथ, 2) शरद दोघे रा कर्नाटक राज्य यांचे कडून विकत घेतलेल्या मेंढ्याचे पैसे न दिल्याचे कारणावरुन फिर्यादीचा मुलगा नामे मल्लीकर्जुन मधुकर कवडे त्याच्या सोबत दिपक घोडके असे मेंढ्या विकण्यासाठी घेवून जात असताना दि.18.03.2024 रोजी 16.00 वा. सु. बाभळगाव जवळ असलेल्या दुध डेअरी प्रकल्पाजवळ नमुद आरोपींनी पिकअप वाहन थांबवुन वाहनासह मल्लीकार्जुन व दिपक घोडके यांना घेवून गेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मधुकर कवडे यांनी दि.21.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 365, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
दुचाकी वाहनांची चोरी
तामलवाडी :फिर्यादी नामे- यशवंत बलभीम लोंढे, वय 40 वर्ष, रा. तामलवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची हिरो स्प्लेंडर कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 एएम 0659 ही दि. 30.12.2023 रोजी 01.30 ते दि. 31.12.2023 रोजी 05.00 वा. सु. यशवंत लोंढे यांचे राहात्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- यशवंत लोंढे यांनी दि.21.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.