• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, November 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव : शेत रस्त्यावर माती पसरवल्याचा जाब विचारल्याने ६६ वर्षीय वृद्धासह पुतण्याला काठी व दगडाने बेदम मारहाण

सारोळा बु. येथील तिघांवर गुन्हा दाखल

admin by admin
November 21, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव  : शेत रस्त्यावर माती का पसरवत आहात, अशी विचारणा केल्याच्या रागातून एका ६६ वर्षीय वृद्ध शेतकऱ्यासह त्यांच्या पुतण्याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, लाकडी काठी आणि दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना धाराशिव तालुक्यातील सारोळा बुद्रुक येथे घडली आहे. याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गावातीलच तीन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सारोळा बु. (ता. जि. धाराशिव) येथील रहिवासी जयंत बलभीम रणदिवे (वय ६६ वर्षे) आणि त्यांचा पुतण्या हे १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:३० ते ६:०० वाजेच्या सुमारास सारोळा बु. शिवारातील शेत गट क्रमांक ४१२ मध्ये असताना हा प्रकार घडला. यावेळी गावातीलच संशयित आरोपी सचिन चंद्रसेन उमाप, प्रविण चंद्रसेन उमाप आणि संतोष घोरपडे (सर्व रा. सारोळा बु., ता. जि. धाराशिव) यांना जयंत रणदिवे यांनी “शेत रस्त्यावर माती का पसरवत आहात?” अशी विचारणा केली.

याच कारणावरून चिडलेल्या तिन्ही आरोपींनी संगनमत करून जयंत रणदिवे आणि त्यांच्या पुतण्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी दोघांना लाथाबुक्क्यांसह काठी आणि दगडाने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून, आरोपींनी त्यांना जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.

उपचारानंतर जयंत रणदिवे यांनी २० नोव्हेंबर रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सचिन उमाप, प्रविण उमाप आणि संतोष घोरपडे या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११७(२) (गंभीर दुखापत करणे), ११५(२) (स्वेच्छेने दुखापत करणे), ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान), ३५१(२), (३) (जीवे मारण्याची धमकी) आणि ३(५) (समान उद्देशाने एकत्रित गुन्हा करणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास धाराशिव ग्रामीण पोलीस करत आहेत.

Previous Post

एआय (AI) क्षेत्रातील ‘आर्थिक फुगा’ फुटण्याच्या उंबरठ्यावर

Next Post

 निष्काळजीपणे गॅस शेगडी वापरून जीव धोक्यात घातल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल

Next Post
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

 निष्काळजीपणे गॅस शेगडी वापरून जीव धोक्यात घातल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : शहरात मटका अड्ड्यांवर पोलिसांची धडक मोहीम

November 21, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

 निष्काळजीपणे गॅस शेगडी वापरून जीव धोक्यात घातल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल

November 21, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : शेत रस्त्यावर माती पसरवल्याचा जाब विचारल्याने ६६ वर्षीय वृद्धासह पुतण्याला काठी व दगडाने बेदम मारहाण

November 21, 2026
एआय (AI) क्षेत्रातील ‘आर्थिक फुगा’ फुटण्याच्या उंबरठ्यावर

एआय (AI) क्षेत्रातील ‘आर्थिक फुगा’ फुटण्याच्या उंबरठ्यावर

November 21, 2026
कळंब – चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या, पतीला जन्मठेप

ज्ञानराज चौगुले, अनिल जगताप यांच्या न्यायालयीन लढ्याला यश!

November 20, 2026

Recent Posts

  • धाराशिव : शहरात मटका अड्ड्यांवर पोलिसांची धडक मोहीम
  •  निष्काळजीपणे गॅस शेगडी वापरून जीव धोक्यात घातल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल
  • धाराशिव : शेत रस्त्यावर माती पसरवल्याचा जाब विचारल्याने ६६ वर्षीय वृद्धासह पुतण्याला काठी व दगडाने बेदम मारहाण
  • एआय (AI) क्षेत्रातील ‘आर्थिक फुगा’ फुटण्याच्या उंबरठ्यावर
  • ज्ञानराज चौगुले, अनिल जगताप यांच्या न्यायालयीन लढ्याला यश!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!