मुरुम :आरोपी नामे-1)मन्या उर्फ मनोज पोतदार, रा. यशवंतनगर मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.28.03.2024 रोजी 18.40 वा. सु. मुरुम बसस्टॅण्ड लगत असलेलृया तौफीक पानटपरी गाड्यावर मुरुम येथे फिर्यादी नामे- तौफीक ईब्राहीम नदाफ, वय 31 वर्षे, रा. नेहरुनगर मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव यांना पानटपरीवर येवून सुपारी खाण्यासाठी मागून पायावर जगमधील पणी फेकून विनाकारण जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, ब्लेड, कटर गळ्यावर पोटावर वार करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे तौफीक नदाफ यांनी दि.29.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे 307, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर :आरोपी नामे-1)बिभीषन अच्युत माने, 2) ओकार धनंजय माने, 3) धनंजय हनुमंत माने, तिघे रा. शिराढोण, 4) सुनिल क्षिरसागर रा. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.28.03.2024 रोजी 21.30 वा. सु. शिराढोण तुळजापूर शेतशिवारातील जमीन गट नं 160 मधील असलेल पत्राचे शेडसमोर फिर्यादी नामे- जितेंद्र महादेव गंभीरे, वय 60 वर्षे, रा. शिराढोण ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे जितेंद्र गंभीरे यांनी दि.29.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 325, 324, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा :आरोपी नामे-1)विमल लक्ष्मण सांगडे, 2) लक्ष्मण भानुदास सांगडे दोघे रा. पाचपिंपळा ता. परंडा जि. धाराशिव दि. 25.03.2024 रोजी 16.00 वा. सु. शेत गट नं 27 येथे फिर्यादी नामे- विजया रामा सांगडे, वय 55 वर्षे, रा.पाचपिंपळा ता. परंडा जि. धाराशिव यांना शेतात शेळी जाण्याच्या कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड व काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विजया सांगडे यांनी दि.29.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे