• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवच्या उमेदवारीबद्दल फडणवीस यांनी एका वाक्यात विषय संपवला …

admin by admin
March 30, 2024
in राजकारण
Reading Time: 1 min read
धाराशिवच्या उमेदवारीबद्दल फडणवीस यांनी एका वाक्यात विषय संपवला …
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला तरी धाराशिव लोकसभा मतदारसंघात अद्याप सामसूम आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे ‘एकला चलो रे’ प्रमाणे मतदारसंघ पिंजून काढत असले तरी, महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. महायुतीचे तिन्ही पक्ष धाराशिवच्या जागेवर अडून बसल्याने हा तिढा अद्याप सुटू शकलेला नाही. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी धाराशिवच्या उमेदवारीबद्दल एका वाक्यात विषय संपवला आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना अखंड होती. शिवसेनेची युती भाजपबरोबर होती. धाराशिव लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आल्याने या मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी मिळाली आणि 5 लाख 96 हजार 640 मते घेऊन दणदणीत विजय संपादन केला होता. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील यांना 4 लाख 69 हजार 74 मते मिळाली होती. राजकीय विजनवासात गेलेल्या ओमराजेना मोदी फॅक्टरमुळे खासदारकीचे लॉटरी लागली होती. मात्र शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपशी काडीमोड घेऊन महाविकास आघाडी स्थापन केल्याने केंद्रात मोदी ( भाजप ) सरकार आणि धाराशिव मतदारसंघात विरोधी खासदार यामुळे गेल्या पाच वर्षात केंद्राकडून या मतदारसंघाला सापत्नपणाची वागणूक मिळाली. त्याचे खापर ओमराजेवर फोडण्यात येत असून, ओमराजेंनी गेल्या पाच वर्षात केंद्राची कोणती योजना या मतदारसंघात आणली, असा सवाल विरोधक करीत आहेत.

सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील यांनी ऐन विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपची उमेदवारी मिळवून, जिल्ह्यात पहिल्यांदा ‘कमळ’ फुलवले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून त्यांना सहज उमेदवारी मिळू शकते, मात्र त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यानंतर काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या माजी आमदार बसवराज पाटील यांचे नाव आघाडीवर होते पण बसवराज पाटील यांनी देखील मराठा विरुद्ध लिंगायत असे जातीय समीकरण होईल म्हणून निवडणुक लढवण्यास नकार दिला. औसाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी देखील आपणास धाराशिव जिल्ह्यातील जनता स्वीकारणार नाही, असे म्हणून जास्त इंटरेस्ट दाखवला नाही. त्यानंतर सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांचे नाव चर्चिले जात होते पण त्यांचा सर्व्हे निगेटिव्ह आल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्याची कोंडी झाली आहे.

सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ओमराजेना तिकीट मिळावे यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना १० कोटी पक्षनिधी देणारे शिवसेना ( शिंदे गट ) नेते आणि पालकमंत्री तानाजी सावंत यांनी पुतणे धनंजय सावंत यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली , यासाठी प्रयत्नशील आहेत, पण धनंजय सावंत ओमराजे पुढे टिकाव धरणार नाही, त्यासाठी एक तर पालकमंत्री तानाजी सावंत यांनी स्वतः निवडणूक लढवावी अन्यथा धाराशिवच्या जागेचा आग्रह सोडून द्यावा असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सूचित केल्यामुळे सावंत यांची गोची झाली आहे. राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) धाराशिवच्या जागेवर हक्क सांगितला असला तरी त्यांच्याकडे तुल्यबळ उमेदवार नाही. अजित पवार गटाचे सुरेश बिराजदार उमेदवारी मिळावी यासाठी सर्वाधिक इच्छूक असले तरी या मतदारसंघातील भाजपचे आमदार आणि तानाजी सावंत सुरेश बिराजदार यांच्या नावाला म्हणावा तितका प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटू शकला नाही.

आज ( शनिवारी ) काँग्रेसचे नेते, माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी झालेल्या पक्षप्रवेशवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना धाराशिवच्या उमेदवारीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी फडणवीस यांनी एका वाक्यात विषय संपवला आहे. धाराशिव जिल्ह्यातील भाजप , शिवसेना ( शिंदे गट ), राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) नेत्यांनी एकत्र बसून कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत एकमुखी निर्णय घ्यावा, त्यावर मी ( देवेंद्र फडणवीस ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार शिक्कामोर्तब करतील,.असे उत्तर दिले. फडणवीस यांच्या या उत्तरामुळे महायुतीची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

विक्रम काळे यांचे नाव आघाडीवर

महायुतीच्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटला नसला तरी विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांचे नाव अचानक पुढे आले आहे. काळे हे सध्या राष्ट्र्रवादी ( अजित पवार गट ) मध्ये आहेत. काळे हे हातात ;घड्याळ; बांधून ओमराजेना चांगली टक्कर देऊ शकतात, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

 

Previous Post

मुरूम, तुळजापूर, परंडा येथे हाणामारी, तीन जखमी

Next Post

ओमराजे नव्हे बोंबराजे …

Next Post
ओमराजे नव्हे बोंबराजे …

ओमराजे नव्हे बोंबराजे ...

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

September 13, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर

September 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

हिंगळजवाडी : शेतातील गवत व झुडपे काढण्यावरून ७५ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाड अन् खोऱ्याने प्राणघातक हल्ला; ५ जणांवर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल

September 12, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

पश्चिम लोहटा : ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाच्या बाजूने हात वर केल्याने ग्रामस्थाला मारहाण; ८ जणांवर शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल

September 12, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

भूम : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला बालविवाह; पीडिता गर्भवती, पतीसह नातेवाइकांवर पोक्सो अन् बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

September 12, 2026

Recent Posts

  • आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद
  • बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर
  • हिंगळजवाडी : शेतातील गवत व झुडपे काढण्यावरून ७५ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाड अन् खोऱ्याने प्राणघातक हल्ला; ५ जणांवर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल
  • पश्चिम लोहटा : ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाच्या बाजूने हात वर केल्याने ग्रामस्थाला मारहाण; ८ जणांवर शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल
  • भूम : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला बालविवाह; पीडिता गर्भवती, पतीसह नातेवाइकांवर पोक्सो अन् बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!