धाराशिव – धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा झालेली नसताना, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना ( उबाठा ) खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर घणाघाती टीका सुरू केली आहे. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सौ. अर्चनाताई पाटील यांनी ओमराजेना खासदार की गुन्हेगार ? असे डिवचले होते.त्यानंतर आता भाजपचे मीडिया सेलचे प्रमुख पांडुरंग पवार यांनी ओमराजे नव्हे बोंबराजे म्हणत सोशल मीडियावर एका धाराशिवकराचं पत्र व्हायरल केले आहे.
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला तरी धाराशिव लोकसभा मतदारसंघात अद्याप सामसूम आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शिवसेना ( उबाठा ) खासदार ओमराजे निंबाळकर हे ‘एकला चलो रे’ प्रमाणे मतदारसंघ पिंजून काढत असले तरी, महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. महायुतीचे तिन्ही पक्ष धाराशिवच्या जागेवर अडून बसल्याने हा तिढा अद्याप सुटू शकलेला नाही. एकीकडे उमेदवार जाहीर झालेला नसताना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ओमराजेना घेरण्यास सुरुवात केली आहे.
भाजपचे मीडिया सेलचे प्रमुख पांडुरंग पवार यांनी ओमराजे नव्हे बोंबराजे म्हणत सोशल मीडियावर एका धाराशिवकराचं पत्र व्हायरल केले आहे. हे पत्र जसेच्या तसे …
बोंबराजेनी फोन उचलला
बोंबराजेनी फोन केला…
आणि बोंबराजेनी खांद्यावर हात टाकला…
म्हणुन बोंबलणाऱ्या शेणक्यानो….
मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
म्हणुन हुरळून गेलेल्या मेंढरानो…..
तसं होऊ नये, परंतु तुमच्या दुर्दैवाने तुमच्या घरातील कोणी आजारी पडु द्या,
उपचाराचा खर्च झेपत नाही म्हणून तुम्ही तुमच्या या फोनवाल्या नेत्याला फोन लावा…
पहिल्यांदा फोन उचलला जाईल पण खर्चाची बाब ऐकताच पुन्हा तुमचा फोन कायमचा ब्लॅक लिस्ट मध्ये जाईल.
चार दिवसात तुम्ही केवळ फोन उचलला म्हणुन हुरळून गेलाय
अरे जा त्या स्व. दिलीप जावळे यांच्या घरी…..
आणि विचारा त्याच्या कुटुंबाला
की हाकेच्या अंतरावर स्व. दिलीप जावळे सोलापूरला उपचार घेत होते पण बोंबराजे साध भेटायला का नाही गेले ?
उपचारासाठी मदत कमी पडली तालुकाध्यक्ष राहिलेले झुंजार शिवसैनिक दिलीप जावळे वारले…
वयाची 30 वर्ष शिवसेनेच्या वाढीसाठी देणाऱ्या या बहादूर नेत्याला शेवटचा निरोप द्यायला सुद्धा बोंबराजे गेले नाहीत…
अंत्यवीधी झाल्यावर तरी घरच्यांना भेटायला जाणे अपेक्षित होते पण ठाकरेंचा कोणताच नेता जावळेच्या कुटुंबाचे सांत्वन करायला गेले नाहीत.
घरी जाऊन सांत्वन केले ते परंड्याचे आ.तानाजीराव सावंत यांनी…
दुसरीकडे मा. राणाजगजितसिंह पाटील हे एक नेतृत्व आहे
पोरांच्या खांद्यावर हात टाकुन फोटो काढत बसायला त्यांना वेळ नाही बाबांनो.
इथं दररोज लोकांना थेट मदत केली जाते.
आरोग्याची कोणतीही अडचण असो त्याला उपचारासाठी योग्य सोय केली जाते.
गंभीर रुग्णांना थेट खिशातील पैसे देऊन उपचारासाठी दाखल केल जातं.
पिकविम्यासाठी सर्वोच्च न्यायालयात 40-50 लाख रु. खर्च करून शेतकऱ्यांची बाजु मांडणारी वकिलांची फौज उभी केली जाते.
बाबांनो कोणी गरीब आपल्या मुलींच्या लग्नासाठी आमंत्रण द्यायला आला तर त्याची पत्रिका हातात घेताना
*काही अडचण आहे का ? असं थेट विचारणारा नेता म्हणजे मा. राणाजगजितसिंह पाटील आहेत.
फक्त विचारून न थांबता सोबत एक माणुस जोडून देऊन त्यांची जी अडचण असेल तर ती घरपोच केली जाते…
फुकट आलेला फोन उचलून पोरहाडगी गप्पा कोणीही मारू शकतो…
फोन उचलून काम काय केलं ते मांडा…
आणि मांडायसारखं काही नसेल तर तुमच्या फोनची अगरबत्ती फिरवायचं बंद करा.
– पांडुरंग (अण्णा )पवार