धाराशिव : आरोपी नामे-1)राघविंद्र उर्फ भैया विजयकुमार कपाळे रा. वडगाव सि. ता. जि. धाराशिव यांनी दि.21.04.2024 रोजी 13.30 वा. सु. वडगाव सि. शिवारात विश्वास भिमराव मोरे यांचे शेतात फिर्यादी नामे- नामदेव खोबा पेठे, वय 70 वर्षे, रा. वडगाव सि. ता. जि. धाराशिव नमुद आरोपीने काही एक कारण नसताना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- नामदेव पेठे यांनी दि.22.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे 324, 323, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : आरोपी नामे-रणजित मच्छींद्र हावळे, 2)मेहताजी शहाजी हावळे, 3) मच्छींद्र धोंडीबा हावळे, 4) अमोल मच्छींद्र हावळे, 5) सुरज बाळु ढेरे, 6) सागर बाळु ढेरे, 7) कविशेर मेसबा ढेरे, 8) अशा अमोल हावळे, 9) सिमा कविशेर ढेरे, 10) छबाबाई मच्छीद्र हावळे सर्व रा. बोरी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.21.04.2024 रोजी 18.00 वा. सु. जिल्हा परीषद शाळा बोरी येथे फिर्यादी नामे- सोमनाथ भारत हावळे, वय 35 वर्षे, रा. बोरी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना व त्यांचे वडील यांना गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सोमनाथ हावळे यांनी दि.22.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 143,147, 149, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ऊसाला आग लावून नुकसान
कळंब : आरोपी नामे-1)अश्रुबा अंकुश काकडे, 2) श्रीराम काशीनाथ काकडे दोघे रा. आडसुळवाडी ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.14.04.2024 रोजी 13.00 वा. सु. शेत गट नं 49 आडसुळवाडी शिवार येथील फिर्यादी नामे- लिंबराज श्रीमंत सुरवसे, वय 44 वर्षे, रा. आडसुळवाडी ता. कळंब जि. धाराशिव यांचे क्षेत्र 63 आर पैकी 20 गुंठ्यातील उस मागील भांडणाचा राग धरुन आग लावून पेटवून दिला. यामध्ये फिर्यादी यांचे अंदाजे 25,000 ₹ चे नुकसान झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- लिंबराज सुरवसे यांनी दि.22.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे 435, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.