येरमाळा : मयत नामे- अमित अनिल लगाडे, वय 22 वर्षे, व सोबत नंदकिशोर नवनाथ खंडागळे, वय 29 वर्षे र. दसमेगाव ता. वाशी हे दोघे दि.15.04.2024 रोजी 21.50 वा. सु. एनएच 52 रोडवरील तेरखेड शिवारातील माउली हॉटेल धाबा समोरुन मोटरसायकल क्र एमएच 25 एसी 5534 हीवर बसुन जात होते. दरम्यान बोलेरो जिप क्र एमएच 12 जेझेड 0619 चा चालकाने त्याचे ताब्यातील बोलेरो जीप ही हायगई व निष्काळजीपणे चालवून अमित लगाडे व नंदकिशोर खंडागळे यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली.
या अपघातात अमित लगाडे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर नंदकिशोर नवनाथ खंडागळे हे गंभीर जखमी झाले. तसेच नमुद बोलेरो जिप चालक हा जखमी यांना उपचारास न नेता बोलेरो जीप जागेवर सोडून पळून गेला. अशा मजकुराच्या मयाताचे वडील फिर्यादी नामे अनिल बन्सी लगाडे, वय 43 वर्षे, रा.दसमेगाव ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.28.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ) सह 134 (अ) (ब), 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
हायगईने व निष्काळजीपणे वाहन चालवुन किरकोळ व गंभीर दुखापत करणाऱ्यावर गुन्हा दाखल
तुळजापूर : जखमी फिर्यादी नामे-बळवंत दत्ता बंडगर, वय 23 वर्षे, र. धारुर ता. जि. धाराशिव हे दि.17.04.2024 रोजी 19.00 वा. सु.सोलापूर ते तुळजापूर रोडवर सांगवी गावचे शिवारातील मोरेश्वर पेट्रोलपंप समोरुन मोटरसायकल क्र एमएच 25 ए.ई. 9478 वरुन जात होते. दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 25 वाय 5699 चा चालकाने त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजीपणे रॉग साईडने चालवून बळवंत बंडगर यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात बळवंत बंडगर हे गंभीर जखमी झाले. तसेच जखमीस उपचार कामी न नेता मोटरसायकल सह पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे बळवंत बंडगर यांनी दि.28.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, सह 134 (अ) (ब), 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.