धाराशिव : सध्या शाळेला उन्हाळी सुट्टी लागली आहे. त्याचा गैरफायदा उचलत चोरटयांनी घाटंग्री जिल्हा परिषद शाळेतील दोन टीव्ही , मॉनिटरवर डल्ला मारला आहे.
दि. 16.05.2024 रोजी 09.40 ते दि. 17.05.2024 रोजी 08.40 वा. सु. जिल्हा परिषद शाळा घाटंग्री येथील कार्यालयाचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून आत प्रवेश करुन दोन टी. व्ही. एसर कंपनीचे व मॉनिटर असा एकुण 1,02,000 ₹ किंमतीचे चोरुन नेले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विदयानंद गोपाळराव पाटील, वय 57 वर्षे, रा. जि.प.प्र.शाळा घाटंग्री मुख्याध्यापक ह.मु. समर्थ नगर धाराशिव यांनी दि.17.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे 454,457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा : दि. 15.05.2024 रोजी 05.00 ते 03.00 वा. सु. पशुराम पेट्रोल पंप वारदवाडी फाटा येथील सेल्स रुमचे पाठीमागील दरवाजृयाचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून आत प्रवेश करुन कपाटामध्ये असणारे रोख रक्कम 67, 820 ₹ चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मनोज कुंडलीक अंधारे, वय 44 वर्षे, व्यवसाय पेट्रोल पंप मॅनेजर माणकेश्वर ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.17.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी : फिर्यादी नामे-गोपाल मदन कारकर, वय 38 वर्षे, रा. अंजनसोंडा ता. भुम जि. धाराशिव यांचे अंजनसोंडा शिवारात शेत गट नं 84 मधील व इतर 7 लोकांच्या शेतातील 79 स्पींक्लअरचे पाईप, 15 नौजल असा एकुण 94, 000₹ किंमतीचे साहित्य दि. 14.05.2024 रोजी 09.00 ते दि. 15.05.2024 रोजी 08.00 वा. सु. संशईत आरोपी नामे- बाळासाहेब हणुमंत मोटे, वय 52 वर्षे, 2) यश बाळासाहेब मोटे, वय 18 वर्षे, रा. अंजनसोडा ता. भुम जि. धाराशिव यांनी चोरुन नेले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गोपाल कारकर यांनी दि.17.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे गुरनं- 145/2024 कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान फिर्यादीने दिलेल्या माहितीच्या आधारे वाशी पोलीस ठाण्याच्या पथकाने नमुद आरोपी आरोपी नामे- बाळासाहेब हणुमंत मोटे, वय 52 वर्षे, 2) यश बाळासाहेब मोटे, वय 18 वर्षे, रा. अंजनसोडा ता. भुम जि. धाराशिव यांना ताब्यात घेवून त्यांचे कडे नमुद गुन्ह्या संदर्भात चौकशी केली असता नमुद आरोपींनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपीस अटक करुन गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.
उमरगा : फिर्यादी नामे-विशाल दत्तात्रय जाधव, वय 26 वर्षे, रा. व्हंताळ ता. उमरगा जि. धाराशिव यांची अंदाजे 15,000₹ किंमतीचीकाळ्या रंगाची स्पेलंडर प्लस मोटरसायकल क्र एमएच 25 वाय 7270 ही दि. 11.05.2024 रोजी 11.30 ते 12.45 वा. सु. कानडे हॉस्पीटल उमरगा चे समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विशाल जाधव यांनी दि.17.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.