धाराशिव : एक 15 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय)ही दि. 13.06.2024 रोजी 10.00 ते दि. 14.06.2024 रोजी 09.30 वा. सु. आपल्या राहत्या घरी एकटी असल्याची संधी साधून गावातीलच एका तरुणांनी तेथे येवून तिस लग्नाचे अमीष दाखवून मोटरसायकल वरती बसवून घेवून जावून जबरदस्तीने तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. यानंतर तिने नकार दिला असता त्या तरुणांनी तीला हाताचापटाने मारहाण करुन घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास तीला व तीच्या कुटूंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतेच्या आईने दि.16.06.2024रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-376,376(3), 366(अ), 323, 506 सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम 2012 चे कलम 4, 6, 8, 12 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मागील भांडणाचे कारणावरुन मारहाण
मुरुम : आरोपी नामे-नागेश मंडले, अविनाश मंडले, सोन्या मंडले, व एक अनोळखी इसम सर्व रा. बेरडवाडी भुसणीवाडी यांनी दि.15.06.2024 रोजी 21.00 वा. सु. मुरुममोडकडे जाणारे वेलकम धाबा मुरुम येथे फिर्यादी नामे-राहुल दिगंबर वाघ, वय 32 वर्षे, रा. माळी गल्ली किसान चौक मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव यांना मागील भांडणाचे कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड, हंटरने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- राहुल वाघ दि.15.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देणाऱ्यावर गुन्हा दाखल
बेंबळी : आरोपी नामे-1)आरबाज जावेद शेख, वय 24 वर्षे, रा. खाजानगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.16.06.2024 रोजी 09.00 वा.सु. संपत शिंदे यांचे घरासमोर रोडवर धारुर येथे छोटा हत्ती क्र एमएच 1 सीएच 3766 वाहनात गोवंशीय जातीची एक गाय वाहनासह अंदाजे 3,20,000₹ किंमतीची तिस पुरेसे अन्न पाणी न देता तिला डांबुन निर्देयतेने वागणुक देवून वाहतुक करीत असताना बेंबळी पो. ठाणेच्या पथकास मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द प्राण्यांना क्रुरुतेने वागणुक प्रतिबंध अधिनियम 1990 कलम 11(1)(घ) (ज) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मालमत्तेविरुध्द गुन्हे
नळदुर्ग : फिर्यादी नामे- वंदना भागवत शिलवंत, वय 45 वर्षे, रा. आरळी खुर्द ता. तुळजापूर जि. धाराशिव या दि. 16.06.2024 रोजी 11.35 वा. सु. नळदुर्ग बसस्थानक येथे नळदुर्ग ते तुळजापूर जाणारे बस मध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने वंदना शिलवंत यांची नजर चुकवून गर्दीचा फायदा घेवून पर्सची चैन उघडून पर्स मधील 9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 2,500 ₹ रोख रक्कम असा एकुण 20,500₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- वंदना शिलवंत यांनी दि.16.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.