धाराशिव : धाराशिव नगरपरिषदेतील कार्यालयातून घर बांधकाम परवाना फाईल (संचिका) गहाळ प्रकरणी अखेर तत्कालीन नगर अभियंता नवनाथ केंद्रे यांच्यावर आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत धाराशिव नगरपरिषदेचे सहाय्यक प्रकाश वशिष्ठ पवार यांनी फिर्याद दिली आहे महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 अंतर्गत कलम सात आठ नऊ अन्वये दाखल करण्यात आला आहे धाराशिव नगरपरिषद कार्यालयात दिनांक पाच जुलै 2018 ते 10 जानेवारी 2022 दरम्यान हा प्रकार घडला आहे. नगरपरिषद कार्यालयातील तत्कालीन नगर अभियंता नवनाथ काकासाहेब केंद्रे हे त्यावेळी कार्यमुक्त झाल्यानंतर पदभार हस्तांतरण केल्याचे दिसून येत नाही तसेच संचिका गहाळ झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल सचिन होनखांबे करीत आहेत.
या प्रकरणी उदयसिंह प्रकाशराव निंबाळकर राहणार धाराशिव यांनी यापूर्वी तक्रार दिली होती. त्या संदर्भात कार्यवाही प्रलंबित होती. जिल्हाधिकारी यांच्याकडे त्यांनी पाठपुरावा केला. दरम्यान धाराशिव नगर परिषद प्रशासन विभागाचे जिल्हा सह आयुक्त यांनी यासंदर्भात धाराशिवनगर परिषदेचे मुख्याध्यापक मुख्याधिकारी यांना स्मरणपत्राद्वारे गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आदेश दिले होते. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली. मौजे धाराशिव शहरातील सिटी सर्वे नंबर 5950, घर नंबर 26/ 277 ची घर बांधकाम परवाना फाईल (संचिका) गहाळ झाली. या प्रकरणी तत्कालीन नगर अभियंता नवनाथ केंद्रे यांच्या विरोधात महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 अंतर्गत कलम 8, 9 नुसार गुन्हा नोंद करण्याच्या आदेश दिले होते. दि. 13 जून 2024 रोजी याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
———