धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी मोबाईल टॉवरची केबल चोरी करणाऱ्या दोन चोरट्याना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसाना यश आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवून मालाविषयक गुन्हे उघड व पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेणे कामी व गुन्ह्याच्या तपासाचे अनुषंगाने आवश्यक त्या साहित्यासह पेट्रोलींग कामी पोलीस पथक कळंब उपविभाग येथे रवाना होवून हासेगांव येथे बस थांबा येथे आले असता पथकास सदर ठिकाणी एका मोटरसायकलवर दोन इसम दोघांचे मध्ये कांहीतरी संशयित सामान घेवून जात असताना दिसले.
यावेळी पोलीस पथकास संशय आल्याने पथकाने त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे- तानाजी हरी काळे, वय 46 वर्षे, संतोष तानाजी काळे, वय 22 वर्षे रा. ईटकुर पारधीपीढी ता. कळंब जि. धाराशिव असे सागिंतले. त्यांनतर पथकाने त्यांना पोत्यामध्ये काय असे विचारले असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्याने पथकाने त्यांचे ताब्यातील सामानाची पाहणी केली असता पांढरे रंगाचे खताचे पोत्यामध्ये टॉवरचे केबल मधील जाळलेले कॉपर तार दिसून आली.
याबाबत अधिक विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, एक वर्षा पासून आरसोली, ता. भुम शिवारातील, चिचंपुर ता. भुम शिवारातील, सांगवी मार्डी ता. तुळजापूर व आळणी ता. धाराशिव शिवारातील टॉवरची केबल कट करुन चोरी केली होती. त्या केबल वायर मधील कॉपर तार आहे. असे सांगीतल्याने गुन्हे अभिलेखाची पाहणी करता 1) पोलीस ठाणे तुळजापूर गुरनं 207/2024 कलम 379 भा.दं.वि.सं, पोलीस ठाणे भुम गुरनं 04/2023 कलम 379 भा.दं.वि.सं.,128/2024 कलम 379 भा.दं.वि.सं, पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण 312/2023 कलम 379 भा.दं.वि.सं प्रमाणे गुन्हे नोंद असल्याची खात्री झाल्याने दोन पंचा समक्ष नमुद आरोपीच्या ताब्यातुन नमुद गुन्ह्यातील मोटरसायकल व कॉपर वायर असा एकुण 84,250 ₹ किंमतीचा माल दि. 22.06.2024 रोजी 17.00 वा. सु. जप्त करुन पुढील कार्यवाही कामी नमुद आरोपीस धाराशिव ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात दिले.