• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, April 27, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव झेडपी सत्तानाट्य: अखेर मुहूर्त ठरला! १३ मार्चला अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड

उपमुख्यमंत्र्यांच्या दरबारात सर्व नेते एकवटले; शिवसेना 'अभेद्य'; एकनाथ शिंदेचा निर्णय अंतिम

admin by admin
March 11, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव झेडपी सत्तानाट्य: अखेर मुहूर्त ठरला! १३ मार्चला अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड
0
SHARES
3.1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: गेल्या महिनाभरापासून रंगलेल्या धाराशिव जिल्हा परिषदेच्या सत्तानाट्याला आता निर्णायक वळण मिळाले आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड अखेर १३ मार्च रोजी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमधील शिवसेनेच्या सर्व प्रमुख नेत्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या दरबारात सर्व नेते एकवटले

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा तिढा सोडवण्यासाठी आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी दिग्गज नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या महत्त्वपूर्ण बैठकीला खालील प्रमुख नेते उपस्थित होते:

  • प्रताप सरनाईक (धाराशिवचे पालकमंत्री)

  • तानाजी सावंत (माजी आरोग्य मंत्री)

  • ज्ञानराज चौगुले (माजी आमदार)

  • रवींद्र गायकवाड (माजी खासदार)

शिवसेना ‘अभेद्य’; उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम

या बैठकीतील सर्वात मोठी घडामोड म्हणजे, धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना पूर्णपणे ‘अभेद्य’ आणि एकसंध असल्याचा स्पष्ट संदेश या नेत्यांनी दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तो आम्हा सर्वांना मान्य असेल,” अशी ग्वाही या सर्वच नेत्यांनी एकमुखाने दिली आहे. यामुळे शिवसेनेत कुठलीही गटबाजी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

अफवांना पूर्णविराम आणि विरोधकांच्या मनसुब्यांवर पाणी

गेल्या काही दिवसांपासून आ. तानाजी सावंत गटाला जाणीवपूर्वक वगळून, शिवसेनेच्या दुसऱ्या गटाच्या ( रवींद्र गायकवाड, ज्ञानराज चौगुले गट ) मदतीने भाजपचाच अध्यक्ष बसवण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या बातम्या पसरवल्या जात होत्या. तसेच, धाराशिव शिवसेनेत दोन गट पडल्याच्या वावड्याही (विशेषतः भाजप आमदार राणा पाटील यांच्या गोटातून) उठवल्या गेल्या होत्या. मात्र, कालच्या या एकजुटीच्या भेटीमुळे या सर्व खोट्या चर्चा आणि अफवांना कायमचा पूर्णविराम मिळाला आहे.


आता १३ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणाच्या नावाला पसंती देतात आणि महायुतीचा धर्म पाळताना नेमका कोणता फॉर्म्युला ठरतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.


शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी संदेश उर्फ विकी चव्हाण यांची निवड

धाराशिव : जिल्हा परिषदेत शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी संदेश उर्फ विकी चव्हाण यांची निवड करण्यात आली असून आता जिल्हा परिषद अध्यक्षपदावर दावा करण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली आहे. आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या पुढाकाराने चव्हाण यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. या निवडीमुळे अध्यक्षपदाच्या निवडीत सावंत यांचे पारडे जड झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

गटनेते म्हणून संदेश उर्फ विकी चव्हाण हे शिवसेना पक्षाचा व्हीप जारी करणे तसेच पक्षाची ध्येयधोरणे सभागृहात राबविण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत. निवडीच्या वेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने 23 जागांवर उमेदवार उभे केले होते, त्यापैकी 15 जागांवर विजय मिळवला. यात सावंत गटाच्या 8 तर माजी खासदार गायकवाड आणि चौगुले गटाच्या 7 जागांचा समावेश आहे. दोन उमेदवारांचा कल भाजपकडे झुकल्याची चर्चा होती. ते भाजपसोबत सहलीला गेल्याचीही माहिती होती, मात्र नंतर त्यांना परत आणण्यात आले.सावंत गटातील गटनेत्याची निवड झाल्याने अध्यक्षपदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

Previous Post

टायर फुटल्याने भीषण अपघात : उमरग्यात दोघांचा जागीच मृत्यू, एक जखमी

Next Post

नाचताना पायावर पाय पडल्याच्या क्षुल्लक कारणावरून तरुणावर लोखंडी कत्तीने हल्ला

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

नाचताना पायावर पाय पडल्याच्या क्षुल्लक कारणावरून तरुणावर लोखंडी कत्तीने हल्ला

ताज्या बातम्या

आनंदनगर पोलिसांचा आणखी एक प्रताप: “चोर पकडला तरी दागिने परत मिळतीलच याची गॅरंटी नाही”; आनंदनगर पोलिसांच्या उत्तराने फिर्यादीला धक्का!

आनंदनगर पोलिसांचा आणखी एक प्रताप: “चोर पकडला तरी दागिने परत मिळतीलच याची गॅरंटी नाही”; आनंदनगर पोलिसांच्या उत्तराने फिर्यादीला धक्का!

April 27, 2026
“फक्त सोनं चोरत जा रे…”; धाराशिव पोलिसांचा चोरांना मोलाचा सल्ला! ९ हजारांच्या चोरीत ३३०० चा ‘रिफंड’ आणि चोराला थेट ‘क्लीन चिट’

“फक्त सोनं चोरत जा रे…”; धाराशिव पोलिसांचा चोरांना मोलाचा सल्ला! ९ हजारांच्या चोरीत ३३०० चा ‘रिफंड’ आणि चोराला थेट ‘क्लीन चिट’

April 27, 2026
विमा कंपनीची नफेखोरी आणि शासनाची बघ्याची भूमिका! धाराशिवचे शेतकरी वाऱ्यावर

विमा कंपनीची नफेखोरी आणि शासनाची बघ्याची भूमिका! धाराशिवचे शेतकरी वाऱ्यावर

April 26, 2026
परंडा येथील माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला करून दरोडा टाकणारी टोळी २४ तासांत जेरबंद; धाराशिव गुन्हे शाखेची धडक कारवाई

परंडा येथील माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला करून दरोडा टाकणारी टोळी २४ तासांत जेरबंद; धाराशिव गुन्हे शाखेची धडक कारवाई

April 26, 2026
 वादग्रस्त ‘स्वयंघोषित राष्ट्रसंत’ लोमटे महाराजांच्या मठात १५ वर्षीय वारकरी विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू; ५ तासांनंतरही प्रशासन बेपत्ता

 वादग्रस्त ‘स्वयंघोषित राष्ट्रसंत’ लोमटे महाराजांच्या मठात १५ वर्षीय वारकरी विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू; ५ तासांनंतरही प्रशासन बेपत्ता

April 26, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group