धाराशिव : इन्स्टाग्रामवर तरुणीशी ओळख करून नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणावर धाराशिव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक 20 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि.24.06.2024 रोजी 13.30 वा. सु. एका गावातील एका तरुणानी नमुद मुलीस इन्स्टाग्रामवर असलेल्या ओळखीतुन बोलावून घेवून तीस जेवण करण्याचे बहान्याने नेहुन तिच्यावर जबरदस्तीने लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीतेने दि.25.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-376 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
दोन ठिकाणी हाणामारी
परंडा : आरोपी नामे-सोमनाथ जनार्धन गायकवाड, रा. बुकी ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.20.06.2024 रोजी 18.00 वा. सु. अंबऋषी रंगनाथ गायकवाड यांचे शेतातील चिंचेचे झाडाखाली फिर्यादी नामे-भाउसाहेब औदुंबर गायकवाड, वय 62 वर्षे, रा. बुकी ता. परंडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-भाउसाहेब गायकवाड यांनी दि.25.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 326, 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : आरोपी नामे-धिरज भागवत माने, सुरज भागवत माने, शुभम प्रेमनाथ जमादार, प्रेमनाथ शाहुराव गायकवाड रा. माडज ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.25.06.2024 रोजी 20.00 वा. सु. ग्रामीण प्रशालाच्या मैदानात माडज येथे फिर्यादी नामे-प्रथमेश शिवराम गायकवाड, वय 17 वर्षे, रा. माडज ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भाडंणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, हंटर, काठी, लोखंडी सळईने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रथमेश गायकवाड यांनी दि.25.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 326, 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.