• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 9, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

पीक विमा : रद्द झालेली राज्य तक्रार निवारण समितीची बैठक चार जुलै रोजी होणार

-आ.कैलास पाटील

admin by admin
June 26, 2024
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
पीक विमा : रद्द झालेली राज्य तक्रार निवारण समितीची बैठक चार जुलै रोजी होणार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – खरीप 2023 च्या पीकविमा मिळताना केंद्र सरकारच्या एका परिपत्रकामुळं शेतकऱ्यांना फटका बसला आहे. याविरोधात राज्य तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल केल्यानंतर .कृषी विभागाच्या सचिवानी 25 जून रोजी बैठक आयोजित केली होती. पण ही बैठक रद्द झाल्यामुळे आमदार कैलास पाटील व विमा अभ्यासक अनिल जगताप यांनी सचिव श्रीमती व्ही. राधा यांची भेट घेतली. आता ही बैठक चार जुलै रोजी होणार असल्याची माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे.

पिक विमा अभ्यासक अनिल जगताप व आमदार कैलास पाटील यांनी दहा जून रोजी केंद्र शासनाने काढलेल्या 30 एप्रिल 2024 च्या परिपत्रकाविरुद्ध प्रशासनाला जाब विचारला होता. राज्यातील शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत राज्य तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल केली. या परिपत्रकामुळे महाराष्ट्रातील 75 टक्के शेतकऱ्याचे नुकसान होत असून सरसकट नुकसान भरपाई पासून शेतकरी वंचित राहत आहे.

चालू खरीप हंगामात जिल्ह्यातील पाच लाख साठ हजार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पिक विमा भरला.त्यापूर्वी कंपनीला 639 कोटी रुपये रक्कम देणे होते.सुरुवातीला 21 दिवस पावसाचा खंड पकडून जिल्हाधिकारी यांनी एक अधिसूचना काढली. त्यात जिल्ह्यातील 57 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 254 कोटी रुपये अग्रीम रक्कम देण्यात आली. नंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पाऊस झाल्याने एक लाख 92 हजार शेतकऱ्यांनी वैयक्तिक पूर्व कल्पना देत नुकसानीची माहिती विमा कंपनीला दिली. मात्र केंद्र शासनाने 30 एप्रिल 2024 रोजी परिपत्रक काढून एखाद्या महसूल मंडळातील विमा भरलेल्या क्षेत्रापैकी 25 टक्के क्षेत्रापेक्षा जास्त पूर्व सूचना आल्या तर वैयक्तिक नुकसानीपासून ते मंडळ वंचित ठेवण्याचा अजब फतवा काढला आहे..

या परिपत्रकानुसार धाराशिव जिल्ह्यात फक्त 37हजार 574 शेतकऱ्यांना 39 कोटी 52 लाख रुपये वितरण केले आहे. या नवीन नियमाचा फटका बसून जिल्ह्यातील 32 महसूल मंडळाला एकही रुपया मिळालेला नाही यामुळे नुकसान भरपाई पासून शेतकरी वंचित राहिला आहे. नवीन परिपत्रका नुसार सरसकट शेतकऱ्यांना केवळ प्रति हेक्टर साडेतीन हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. यापूर्वी पाच हजार रुपये अग्रीम दिल्याने दीड हजार रुपये विमा कंपनीला परत देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.

शेतकऱ्यावर होत असलेला हा अन्याय लक्षात घेऊन अनिल जगताप व आमदार कैलास पाटील यांनी आज थेट राज्य तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल केली. पिक विमाबाबत 26 जून 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल करता येते.त्याप्रमाणे ही याचिका दाखल केली आहे. कृषी विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय.ए. कुंदन यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी 25 जून रोजी सुनावणी घेणार असल्याचे सांगितले होते. मात्र ही बैठक रद्द झाली होती. यासाठी आमदार पाटील व श्री. जगताप यांनी नवीन पदभार घेतलेल्या सचिव श्रीमती व्ही. राधा यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी अधिकृत पत्र काढून रद्द झालेली बैठक चार जुलै रोजी घेण्याचा निर्णय घेतला.जून 2024 चे परिपत्रक रद्द करून 26 जून 2023 च्या परिपत्रकानुसार नुकसान भरपाई द्यावी अशी प्रमुख मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे हित लक्षात घेऊन केंद्र शासनाने अचानक पणे काढलेल्या 30 एप्रिलच्या परिपत्रकाविरुद्ध राज्य समितीकडे याचिका दाखल केली आहे.जून 2023 च्या परिपत्रकानुसारच विमा नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांच्यासह मी केली आहे. चार जुलै रोजी सुनावणी होऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल.
– अनिल जगताप

Previous Post

धाराशिव – इन्स्टाग्रामवर तरुणीशी ओळख करून लैंगिक अत्याचार

Next Post

धाराशिव : पंधरा हजाराची लाच घेताना दोन पोलीस एसीबीच्या जाळ्यात

Next Post
कळंब तहसीलदारांच्या वाहन चालकांने साहेबाच्या नावावर आठ हजार लाच घेतली

धाराशिव : पंधरा हजाराची लाच घेताना दोन पोलीस एसीबीच्या जाळ्यात

ताज्या बातम्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

September 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला

September 9, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी

September 8, 2026

Recent Posts

  • पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
  • शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास
  • भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण
  • अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला
  • नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!