बेंबळी : आरोपी नामे-वाजीद रहीमतुल्ला शेख, रहीमतुल्ला मकबुल शेख, साजीद रहीमतुल्ला शेख सर्व रा. टाकळी बेंबळी ता. जि. धाराशिव यांनी दि.27.06.2024 रोजी 20.45 वा. सु. टाकळी बेंबळी येथे फिर्यादी नामे- तोहीत मिरासाब शेख, वय 24 वर्षे, रा. टाकळी बेंबळी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी संगणमत करुन बांध फोडण्याचे व रस्त्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, धारधार वस्तुने पोटात डावे बाजूस मारुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-तोहीत शेख यांनी दि.28.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 307, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा : आरोपी नामे-संतोष व्यंकट जावळे पाटील, मनोज रमेश जावळे पाटील, शेषेराव शंकरराव जावळे पाटील, लतिका सुरेश जवळे पाटील, अनुराधा व्यंकट जावळे पाटील सर्व रा. नागुर ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि. 23.06.2024 रोजी 9.00 वा. सु. शेत गट नं 32/2 नागुर येथे फिर्यादी नामे- दिनकरराव शंकरराव जावळे पाटील, वय 62 वर्षे, रा. नागुर ता. लोहारा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी संगणमत करुन शेतातील पेरणीच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुऱ्हाडीच्या दांडयाने, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दिनकरराव जावळे यांनी दि.28.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 447, 324, 323, 504, 506, 143, 147, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण : आरोपी नामे-राहुल सोपान आल्टे, समाधान दोघे रा. वाठवडा हा.मु. पळसप पाटी ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.26.06.2024 रोजी 18.30 वा. सु. पळसप पाटी येथे वाठवडा शिवार फिर्यादी नामे- संजय सोपान आल्टे, वय 52 वर्षे, रा. वाठवडा हा.मु. पळसप पाटील ता. कळंब जि. धाराशिव यांना व त्यांची पत्नी, व मुलगा यांना नमुद आरोपींनी जागेच्या वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. फिर्यादीच्या हॉटेल समोरील खुर्च्या व रांजण फोडून नुकसान केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संजय आल्टे यांनी दि.28.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 324, 427, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मालमत्तेविरुध्द गुन्हे
परंडा : फिर्यादी नामे-मीना रामचंद्र शास्त्री, वय 62 वर्षे, रा. धायरी ता. जि. पुणे या दि. 26.06.2024 रोजी दुपारी 01.00 ते सायंकाळी 06.30 वा. सु. स्वारगेट पुणे बसस्थानक ते परंडा जि. धाराशिव बसस्था दरम्यान बसमध्ये प्रवास करत असताना अज्ञात व्यक्तीने मीना शास्त्री यांचे बॅगमधील 45 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 5,000₹ असा एकुण 72,500₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मीना शास्त्री यांनी दि.28.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.