धाराशिव – विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारावर डल्ला मारणाऱ्या महात्मा गांधी विद्या मंदिर , केसरजवळगा (ता .उमरगा) येथील शाळेची शुक्रवारी सखोल चौकशी करण्यात आल्यानंतर अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.
केसरजवळगा येथे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा गांधी विद्या मंदिर हि शाळा चालविण्यात येते . विद्यार्थ्यांची योग्य वाढ व्हावी ,चांगली प्रतिकार शक्ती निर्माण व्हावी यासाठी राज्य सरकार योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी देते . इयत्ता पहिली ते आठवी पर्यतच्या विध्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो .तर दर शुक्रवारी पूरक आहाराची तरतूद करण्यात आली आहे . मात्र महात्मा गांधी विद्या मंदिर मध्ये पूरक आहार दिला जात नसल्याची तक्रार शेखर चिंचोरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे केली होती .
त्यानुसार २८ जून रोजी उपशिक्षणाधिकारी दत्ता लांडगे , विस्तार अधिकारी युवराज पडवळ ,गटशिक्षण अधिकारी शिवकुमार बिराजदार केंद्रप्रमुख बालाजी भोसले यांच्या चौकशी समितीने केलेल्या चौकशीत अनेक शाळेच्या अनागोंदी कारभाराच्या अनेक प्रकार समोर आले आहेत . गावातच असणाऱ्या जिल्हा परिषेदेच्या इयत्ता पाचवीतील जवळपास ४० विधार्थ्यांच्या पालकांची कोणतेही पूर्वपरवानगी न घेता दाखल्याशिवाय शाळेत बसवून त्यांच्या नावावर पोषण आहाराची मागणी करून डल्ला मारण्याचा प्रकार चौकशी समितीच्या निदर्शनास आले आहे .
गट वर्षी सुद्धा जिल्हा परिषेदेच्या हजेरी पटावर असणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे महात्मा गांधी विद्या मंदिराच्या हजेरी पटावर दाखवून त्यांच्या नावावर पोषण आहारावर डल्ला मारून सरकारी अनुदानावर डल्ला मारला होता ,या संदर्भात गत वर्षांपासून शिक्षण विभागाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष यांच्या आदेशानुसार महात्मा गांधी विद्या मंदिर येथील शाळेची कसून तपासणी करण्यात आली आहे .
चौकशी दरम्यान हजेरी पत्रक न भरणे , टाचण वह्या मध्ये नोंदी नसणे ,घोषवारा नसणे, अश्या अनेक चुका निदर्शनास आल्यानंतर चौकशी समितीने मुख्याध्यापकासह शिक्षकांची चांगलीच कान उघाडणी केली .प्रश्नांची सरबत्ती सुरु केल्यानंतर मुख्याध्यापकास शिक्षकांची भंबेरी उडाली होती . विशेष म्हणजे मराठी शाळेतल्या शिक्षकांना नीट आणि शुद्ध मराठी बोलता न येणे , दाखला कसा मागितला जातो , यासाठी अर्ज कसा आणि कोणी करावा लागतो या संदर्भात शिक्षक अनभिज्ञ असल्याचे निदर्शनास आले आहे . शालेय शिक्षण विभागाच्या नियमानुसार अनेक कागदपत्रांची पूर्तता न करता अर्धवट ठेवत शिक्षण विभागाची फसवणूक करत असल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनास आले आहे,
पोषण आहाराच्या बोगस आणि बनावट पावत्या देऊन शालेय पोषण आहाराच्या अनुदानावर डल्ला मागील १३ वर्ष्यापासून मारत असल्याची तक्रार करण्यात येत होती ,मात्र तालुक्यातील अधिकारी संबंधित मुख्याध्यापकाला पाठीशी घालत होते ,मात्र या संदर्भात पुराव्यानिशी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे तक्रार केल्यानंतर शाळेचे धाबे दणाणले आहेत . शाळेचे मुख्याध्यापक ,शिक्षक ,विध्यार्थी यांचे लेखी जबाब चौकशी समितीने घेतले असून या संदर्भातला अहवाल शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आल्यानंतर कारवाईची करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे .