• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, August 1, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचे अर्ज भरण्यास सुरूवात…

प्रतिष्ठान भवन, धाराशिव येथे प्रातिनिधिक अर्ज भरण्यात आला...

admin by admin
July 1, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचे अर्ज भरण्यास सुरूवात…
0
SHARES
872
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – महायुती सरकारने चालू पावसाळी अधिवेशनात राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. आजपासून ते १५ जुलै पर्यंत सदर योजनेमध्ये आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करायचे आहेत. या अनुषंगाने आज दि.०१ जुलै रोजी प्रतिष्ठान भवन, भाजपा कार्यालय धाराशिव येथे सौ. रमा दत्ता घोडेराव रा. धाराशिव या भगिनीचा अर्ज प्राथमिक स्वरूपात भरून योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अस्मिताताई कांबळे आणि सागरबाई घोडेराव उपस्थित होत्या.

या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लक्ष रुपये पेक्षा कमी असणाऱ्या २१ ते ६० वयोगटातील महिलांना दरमहा रु. १५०० मानधन देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांनी आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, बँक पासबुक प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड इत्यादी कागदपत्रासह जवळील अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र येथे संपर्क साधावा. तसेच या कामी बूथ स्तरावर भाजप पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख सहकार्य करणार आहेत.

राज्य सरकारने या योजनेसाठी रु. ४५,००० कोटींची आर्थिक तरतूद केलेली असून या माध्यमातून राज्यातील २.५ कोटी महिला भगिनींना प्रत्येक महिन्याला रु. १५००/- चा आधार मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. १ जुलै ते १५ जुलै या कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज करणे गरजेचे आहे. ऑनलाईन अर्ज केलेली पावती जपून ठेवावी. या प्रक्रियेदरम्यान कोणत्याही लाभार्थ्यास काहीही गैरसोय किंवा अडचण निर्माण झाल्यास त्यांनी बूथ स्तरावर भाजप पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख अथवा प्रतिष्ठान भवन, धाराशिव येथे संपर्क साधावा. तरी सर्व पात्र माता भगिनींनी या कल्याणकारी योजनेचा लाभ घ्यावा.
– राणाजगजितसिंह पाटील.

Previous Post

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना

Next Post

अंबेहोळच्या जिल्हा परिषद शाळेत बालविवाह

Next Post
अंबेहोळच्या जिल्हा परिषद शाळेत बालविवाह

अंबेहोळच्या जिल्हा परिषद शाळेत बालविवाह

ताज्या बातम्या

बार्शी-बोरफळ रस्त्याचा चिखल, लाडक्या कंत्राटदाराची पाठराखण अन् साहेबांचे ‘पाहणीचे नाटक’!

बार्शी-बोरफळ रस्त्याचा चिखल, लाडक्या कंत्राटदाराची पाठराखण अन् साहेबांचे ‘पाहणीचे नाटक’!

August 1, 2026
उमरगा नगर परिषदेच्या कचरा वाहन प्रकरणाला वेग

उमरगा उपजिल्हा रुग्णालय प्रकरणाला नवे वळण; FIR, खुलासा आणि विलंबावर ऍड. शीतल चव्हाण यांचे गंभीर सवाल

August 1, 2026
येरमाळ्याच्या सुपुत्राचा जागतिक डंका; अमेरिकेत १८०९ एकर आधुनिक शेती, ४०० कोटींच्या कृषी संशोधन कंपनीचे नेतृत्व

येरमाळ्याच्या सुपुत्राचा जागतिक डंका; अमेरिकेत १८०९ एकर आधुनिक शेती, ४०० कोटींच्या कृषी संशोधन कंपनीचे नेतृत्व

August 1, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुरुम पोलिसांची हायवेवर धडक कारवाई! कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या ९ जनावरांची सुटका

August 1, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव शहरात खिरणीमळा येथे पोलिसांचा छापा! कत्तलीसाठी डांबलेल्या २ गोवंशीय गायींची सुटका

August 1, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!