धाराशिव – साहेबासाठी दहा हजार आणि स्वतःसाठी दीड हजार अशी ११ हजार ५०० रुपये लाच स्वीकारताना धाराशिव पंचायत समितीतील तांत्रीक सहाय्यक (कंत्राटी) यास एसीबी पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे.
प्रवीण पार्श्वनाथ गडदे ( वय-41 वर्षे ) पद-तांत्रीक सहाय्यक (कंत्राटी) पंचायत समिती धाराशीव, रा. ग्रीन लॅंड शाळेजवळ, आनंदनगर, धाराशीव. असे या लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे.
यातील तक्रारदार ( पुरुष, वय 31 वर्षे ) यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहीर मंजुर असुन सदर विहरीचे काम सुरु करण्यापुर्वी जिओ टॅगींग करुन अॅानलाईन अपलोड करण्यासाठी आरोपी याने तक्रारदार यांचेकडे दिनांक 03/07/2024 रोजी पंच साक्षीदारासमक्ष साहेबांसाठी 10,000/- रुपये व स्वतःसाठी 1500/- रुपये अशी एकुण 11,500/- रुपयेची लाच रकमेची मागणी करुन आज रोजी पंच साक्षीदारा समक्ष 11,500/-रुपये लाच रक्कम स्वतः स्वीकारली असता आरोपी यास ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन आनंदनगर, ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. हा सापळा एसीबीचे पोलिस निरीक्षक नानासाहेब कदम, पोलीस अंमलदार सिध्देश्वर तावसकर, आशीष पाटील, अविनाश आचार्य.यांनी रचला होता.
लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा
कार्यालय 02472 222879 टोल फ्री क्रमांक.1064