• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, November 13, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

सामाजिक वनीकरणचा बोगस कारभार: RTI मध्ये ‘शून्य’ झाडे, पण सिंदफळला २२ हजार झाडांचा ‘फलक’ उभा!

 शासकीय दस्तऐवज आणि प्रत्यक्ष फलक यांतील तफावतीमुळे खळबळ

admin by admin
October 22, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
सामाजिक वनीकरणचा बोगस कारभार: RTI मध्ये ‘शून्य’ झाडे, पण सिंदफळला २२ हजार  झाडांचा ‘फलक’ उभा!
0
SHARES
279
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: “पाच वर्षात एकही झाड लावले नाही,” अशी धक्कादायक माहिती अधिकारात (RTI) देणाऱ्या तुळजापूर सामाजिक वनीकरण विभागाचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. एकीकडे वृक्षारोपण ‘निरंक’ असल्याचे अधिकृतपणे कळवले जात असताना, दुसरीकडे शासनाची दिशाभूल करण्यासाठी सिंदफळ (ता. तुळजापूर) शिवारात तब्बल २२ हजार झाडे लावल्याचा फलक लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सुधीर जमदाडे यांनी हा प्रकार उघडकीस आणला असून, हा केवळ कागदोपत्री काम दाखवण्यासाठी आणि फोटो सेशन करण्यासाठी लावलेला खोटा फलक असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

आज (दि. २२ ऑक्टोबर) रोजी सिंदफळ येथील गट नंबर १८४ मध्ये सामाजिक वनीकरण विभागाचा एक फलक आढळून आला आहे. या फलकावरील माहिती धक्कादायक आहे. फलकावरील माहिती काय सांगते?

  • विभाग: महाराष्ट्र शासन, सामाजिक वनीकरण विभाग उस्मानाबाद
  • ठिकाण: गाव – सिंदफळ, गट क्र. १७४, परिक्षेत्र – तुळजापूर
  • क्षेत्र: १० हेक्टर + ४ हेक्टर
  • रोपसंख्या: १६००० +६४००
  • लागवड वर्ष: सन २०२२

 

RTI मधील माहिती काय सांगते?

याउलट, तुळजापूर  येथील माहिती अधिकार कार्यकर्ते हेक्टर जमदाडे यांनी १० सप्टेंबर २०२५ रोजी सामाजिक वनीकरण विभागाकडे मागील ५ वर्षातील (२०२० ते २०२५) वृक्षारोपणाची माहिती मागवली होती. त्याला विभागाने ७ ऑक्टोबर २०२५ रोजी अधिकृत लेखी उत्तर दिले. या उत्तरात, “मागील ५ वर्षांत या कार्यालयामार्फत तुळजापूर तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वृक्षारोपणाचे काम करण्यात आलेले नाही,” असे स्पष्ट म्हटले होते. त्यामुळे लागवड, खर्च, आणि जिवंत झाडांची माहिती ‘निरंक’ असल्याचे विभागानेच लेखी स्वरूपात कबूल केले होते.’निरंक’ माहिती विरुद्ध २२ हजार झाडेआता या नवीन फलकामुळे मोठा संभ्रम आणि विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

१. जर सन २०२२ साली (जे मागील ५ वर्षातच येते) सिंदफळ येथे गट क्र. १७४ मध्ये २२ हजार  रोपांची लागवड झाली होती, तर मग माहिती अधिकारात ‘काम निरंक’ (NIL) आहे, अशी खोटी माहिती का दिली?

२. आणि जर माहिती अधिकारातील उत्तर खरे असेल (म्हणजे एकही झाड लावले नसेल), तर मग हा २२ हजार झाडांचा शासकीय फलक कोणाच्या आदेशाने आणि कोणत्या हेतूने लावला?

३. केवळ फलक लावून वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि शासनाची दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे का? या प्रकारामुळे, प्रत्यक्षात कोणतेही काम न करता केवळ फलक लावून शासकीय निधी हडप करण्याचा किंवा खोटे रेकॉर्ड तयार करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


कार्यालयात शुकशुकाट, मग कर्मचारी जातात कोणत्या ‘फिल्ड’वर?

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, तुळजापूर येथील सामाजिक वनीकरण कार्यालयात कर्मचारी कधीच हजर नसतात. चौकशीसाठी गेल्यावर केवळ एक शिपाई भेटतो आणि ‘साहेब फिल्डवर गेले आहेत,’ असे ठरलेले उत्तर देतो. आता माहिती अधिकारातूनच उघड झाले आहे की, मागील पाच वर्षांत वृक्षारोपणाचे कोणतेही काम झालेले नाही. त्यामुळे, “जर पाच वर्षात एकही झाड लावले नाही, आणि २२ हजार झाडांचे फक्त खोटे फलक लावले जात असतील, तर हे सर्व कर्मचारी आणि अधिकारी नेमके कोणत्या फिल्डवर जातात?” असा संतप्त सवाल नागरिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विचारत आहेत. कोणतेही काम नसताना हे कार्यालय केवळ पोसून शासन काय साधत आहे आणि जनतेच्या पैशाचा अपव्यय का करत आहे, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे, अशी मागणी होत आहे.
Previous Post

राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांनी घेतला बळी; दाळींबजवळ दोन कारच्या भीषण अपघातात बिदरचे चौघे ठार, दोघे गंभीर

Next Post

घेतलाय का ‘खाकी’चा इंगा? धाराशिव जिल्ह्यात ‘डुप्लिकेट’ पोलिसांचा सुळसुळाट; एका आठवड्यात तिघांना गंडा!

Next Post
घेतलाय का ‘खाकी’चा इंगा? धाराशिव जिल्ह्यात ‘डुप्लिकेट’ पोलिसांचा सुळसुळाट; एका आठवड्यात तिघांना गंडा!

घेतलाय का 'खाकी'चा इंगा? धाराशिव जिल्ह्यात 'डुप्लिकेट' पोलिसांचा सुळसुळाट; एका आठवड्यात तिघांना गंडा!

ताज्या बातम्या

धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी

रक्षकच बनले भक्षक!

November 13, 2025
धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी

धाराशिव: बदली होऊनही १४ पोलीस अंमलदार जुन्याच जागी

November 13, 2025
धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास

तुळजापूर: महिलेवर अत्याचार प्रकरणी आरोपीस १० वर्षे सक्तमजुरी; धाराशिव न्यायालयाचा निकाल

November 12, 2025
धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास

प्रेमसंबंधातून महिलेला पेटवल्याप्रकरणी आरोपीस १० वर्षांची शिक्षा

November 12, 2025
विद्याचरण कडावकर धाराशिवचे नवे निवासी उपजिल्हाधिकारी

विद्याचरण कडावकर धाराशिवचे नवे निवासी उपजिल्हाधिकारी

November 12, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group