• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 31, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

पुणे-हरंगूळ विशेष रेल्वेगाडीचे धाराशिवमध्ये जल्लोषात स्वागत

मोटरमनसह स्टेशन मास्तरचाही सत्कार

admin by admin
October 11, 2023
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
पुणे-हरंगूळ विशेष रेल्वेगाडीचे धाराशिवमध्ये जल्लोषात स्वागत
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – अनेक वर्षांपासून धाराशिवकरांची लातूर-पुणे इंटरसिटी रेल्वेगाडीची मागणी होती. हरंगूळ-पुणे ही विशेष रेल्वेगाडी सुरू झाल्याने या मागणीला मूर्त रूप आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य धाराशिवकर आणि व्यापारी बांधवांनी या नव्या विशेष रेल्वेगाडीचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. तसेच मोटरमन आणि स्टेशनमास्तरचा बुके देऊन सत्कारही करण्यात आला.

पुण्याहून मंगळवारी सकाळी ठीक सहा वाजता पहिल्या विशेष रेल्वेगाडीचे प्रस्थान झाले. हरंगूळच्या दिशेने निघालेली ही गाडी धाराशिव रेल्वेस्थानकात सकाळी ठीक पावणे आकारा वाजेच्या सुमारास दाखल झाली. रेल्वेगाडी स्थानकात दाखल होताच जोरदार घोषणांसह फुलांचा वर्षाव करीत या विशेष रेल्वेगाडीचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. मोटरमन गोरे, स्टेशनमास्तर श्री. मिनाजी आणि सुनील मिश्रा यांना बुके देऊन धाराशिवकरांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

या विशेष रेल्वेगाडीचा जास्तीत जास्त प्रवासी बांधवांनी लाभ घ्यावा, जेणेकरून दोन महिन्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या या गाडीचा प्रतिसाद पाहून या मार्गावर कायमस्वरूपी गाडी सुरू होण्याचा मार्ग प्रशस्त होईल असा आशावाद अनेकांनी व्यक्त केला आहे.

अनेक दिवसापासून मागणी

पुणे – लातूर-  पुणे ही  इंटरसिटी रेल्वे  सुरु करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसापासून सुरु होती, अखेर प्रत्यक्षात काल १० ऑक्टोबरपासून ही इंटरसिटी रेल्वे सुरु होणार झाली आहे.

मराठवाड्यातून पुण्याकडे मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत असतात. पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे शिवाय अलीकडे पुण्याची ओळख आयटी हब म्हणून होऊ लागली आहे तसेच  पुणे एक महत्त्वाच पर्यटन स्थळ देखील आहे. अशा परिस्थितीत मराठवाड्यातील लातूरहून मोठ्या प्रमाणात प्रवासी दररोज पुण्याला येतात.  कामानिमित्त, शिक्षणासाठी लातूर ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या विशेष उल्लेखनीय आहे.यामुळे पुणे ते लातूर या रेल्वे मार्गावर सुरु असलेल्या ट्रेनमध्ये प्रवाशांची कायमच गर्दी पाहायला मिळते.

सध्या लातूरहून पुण्याला जाण्यासाठी बिदर एक्सप्रेस, नांदेड एक्सप्रेस, हैदराबाद एक्सप्रेस आणि अमरावती एक्सप्रेस उपलब्ध आहेत.यापैकी बिदर एक्सप्रेस आणि नांदेड एक्सप्रेस रात्री धावतात तर हैदराबाद एक्सप्रेस आठवड्यातून तीनदा धावते तसेच अमरावती एक्सप्रेस आठवड्यातून दोनदा धावते. विशेष म्हणजे या ट्रेनमध्ये कायमच गर्दी राहते. यामुळे प्रवाशांना दोन-तीन महिने आधीच तिकीट बुकिंग करून घ्यावे लागते.असे करूनही अनेकदा प्रवाशांना या ट्रेनचे तिकीट मिळत नाही. परिणामी पुणे-लातूर इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी केल्या काही दिवसांपासून जोर धरत होती. .

सकाळी ६:१० वाजता – पुण्याकडून लातूरला रवाना होईल आणि दुपारी १२:१० मी. लातूरला पोहोचेल तसेच दुपारी ३:०० वाजता लातूरहून पुण्याला रवाना होईल आणि रात्री ९:०० वाजता पुण्यात पोहोचेल.

Previous Post

वादच वाद … धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालय झाले बाद …

Next Post

शेकापूर ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयाचा अपहार

Next Post
शेकापूर ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयाचा अपहार

शेकापूर ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयाचा अपहार

ताज्या बातम्या

धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

नळदुर्गमध्ये गोवंशीय मांसाची वाहतूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 31, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; कळंबमध्ये घरफोडी, तुळजापुरात दुचाकी तर मुरुममध्ये सोलार प्लेटसह केबल लंपास

October 31, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

सिंदफळ शिवार : समर्थ हॉटेलवरून तेलंगणातील ४० वर्षीय व्यक्तीचे अपहरण; तुळजापूर पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

October 29, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर नवीन बसस्थानक : बसमध्ये चढताना ७९ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबवली; सोलापूरच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

October 29, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

शेळका धानोरा : १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत १४ लाखांहून अधिकचा अपहार

October 29, 2026

Recent Posts

  • नळदुर्गमध्ये गोवंशीय मांसाची वाहतूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; कळंबमध्ये घरफोडी, तुळजापुरात दुचाकी तर मुरुममध्ये सोलार प्लेटसह केबल लंपास
  • सिंदफळ शिवार : समर्थ हॉटेलवरून तेलंगणातील ४० वर्षीय व्यक्तीचे अपहरण; तुळजापूर पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
  • तुळजापूर नवीन बसस्थानक : बसमध्ये चढताना ७९ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबवली; सोलापूरच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
  • शेळका धानोरा : १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत १४ लाखांहून अधिकचा अपहार
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!