मुरूम : केसरजवळगा येथे शनिवारी सकाळी 8 च्या सुमारास शेतकरी महिला निर्मला हणमंत लकडे (वय 36) यांच्यावर शेतात काम करताना विषारी सापाने दंश केला. या दंशामुळे त्यांचा मृत्यू झाला.
निर्मला या शनिवारी सकाळी शेतात ज्वारीचे कडबा काढत असताना सापाने त्यांना दंश केला. दंशामुळे त्यांना तात्काळ मुरूम येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.
मृत निर्मला यांच्या पश्चात पती, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. मुरूम येथील सरकारी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश बेंबळगे आणि डॉ. सिफणा तांबोळी यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आला.सायंकाळी 4 च्या सुमारास केसरजवळगा येथे निर्मला यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला.