तामलवाडी : तामलवाडी टोलनाक्यावर एका धक्कादायक घटनेत, चार दारुड्यांनी एसटी चालकावर हल्ला करून त्यास जखमी केले आहे. याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सदर घटना दिनांक 13 जुलै 2024 रोजी सायं 16.25 वाजता घडली असून फिर्यादी, जेजरथ उत्तरेश्वर कोळी, वय 53 वर्षे, हे एसटी चालक आहेत.फिर्यादी बस थोडी पुढे घेत असताना, नमुद आरोपींनी मागे येऊन त्यांच्या गाडीला धक्का दिला. त्यानंतर ते बसमध्ये चढून शिवीगाळ आणि मारहाण करत जखमी केले.
आरोपी नामे-यशवंत शिवाजी खेडकर, रा. वंजारवाडी, ता. बारामती जि. पुणे , सतिश किसन कदम, रा. कटफळ ता. बारामती जि पुणे, भारत शिवाजी खेडकर, रा. वंजारवाडी ता. बारामती जि. पुणे, अंबादास सुखदेव नागवडे रा. घोडेगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 132, 121(1), 352 आणि 3(5) अन्वये तामलवाडी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.
या घटनेनंतर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कर्मचाऱ्यांनी अशा अत्याचारावर त्वरित कारवाई आणि आरोपींवर कठोर शिक्षेची मागणी केली आहे.
घटनास्थळ: तामलवाडी टोलनाका
घटनेची तारीख आणि वेळ: 13.07.2024, 16.25 वाजता
गुन्हा दाखल: फिर्यादी जेजरथ कोळी यांनी दि. 13.07.2024 रोजी दिलेल्या तक्रारीवरून तामलवाडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 132, 121(1), 352, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गुन्हा कलमे:
- कलम 132: सार्वजनिक सेवकाला त्याच्या कामात अडथळा आणणे
- कलम 121(1): बंडखोरी
- कलम 352: स्वैच्छिक जखमी करणे
- कलम 3(5): गटात गुन्हा करणे